कढोली (खु.) येथील घरकुलाच्या ‘ड’ यादीत घोळ पात्र लाभार्थ्यांना केले अपात्र नव्याने नावे समाविष्ट करण्याची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – तालुक्यातील कढोली (खु.) येथील ग्रामपंचायतीच्या घरकुलाच्या ‘ड’ यादीत प्रचंड प्रमाणात घोळ झाला असून पात्र लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आल्याने ११० नागरिकांवर बेघर राहण्याची पाळी आली आहे.
यासंदर्भात संतप्त लाभार्थ्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पात्र असताना ज्या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे. अशा लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करून यादीत समाविष्ट करण्याची मागणी कढोली (खु.) येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता उपरे, दत्ता मसे, निलेश कुरसंगे, प्रेम बोंडे, संतोष गंधमवार, रमेश वडस्कर, गजानन भोयर, ज्ञानेश्वर ताजने, दादाजी बोढे, मलकू येडमे व इतर लाभार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here