समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

अमृत महोत्सवी वर्षात देशाला शक्तिशाली बनविणारा, बाहुबली पंतप्रधान विश्वगौरव नरेन्द्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भयमुक्त, भुकमुक्त, विषमता मुक्त, रोजगारयुक्त, डिजिटलयुक्त, उर्जयुक्त, समानतायुक्त, सेवायुक्त, असा दुरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे. 25 वर्षांची राष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट या माध्यमातून मा. अथमंत्र्यानी सादर केली असून पुढील शंभर वर्षांच्या मजबूत ढाचा शक्तीशाली पायाभूत सुविधांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पात मांडल्याने आपला देश जागतिक विकासाच्या स्पर्धेत आता मागे राहणार नाही असा आत्मविश्वास प्रदान करणारा आहे. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प म्हणजे समग्र कल्याणाचा संदेश देत गरिबांना सक्षम, बलवान आणि सार्थ्यावन बनविणारा आहे, हे निश्चित!
पायाभूत सुविधांचा विचार केल्यास रस्ते महामार्गाच्या विकासाची गती आता 25 हजार किलोमीटर पर्यंत वाढवून तसेच येत्या काळात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करून उज्जवल भविष्याची नांदी दिली आहे.
पी एम ई विद्या च्या माध्यमातून डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी 200 चॅनेल चे नियोजन नवी क्रांती घडवेल असा मला विश्वास आहे. शेतकऱ्यांचा माल एमएसपी ने खरेदी करणे, ऑरगॅनिक शेतीला प्रोत्साहन देणे, ग्रीन एनर्जी किंवा कृषी आधारीत इंधनाला प्रोत्साहन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरेल. हर घर जल, सर्व सामान्य माणसाला स्वस्त घर, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांत पेन्शन समानता, उद्योगाला, स्टार्ट अप ला प्रोत्साहन देऊन, संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया ला प्राधान्य देणे हा आत्मनिर्भर भारत ची यशवी संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी उत्तम पुढाकार आहे असे मला वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here