आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते कॅन्सरग्रस्तांना धनादेशाचे वितरण

By : Mohan Bharti

राजुरा  :– शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने क्षेत्रातील कॅन्सरग्रस्त रुग्णास उपचाराकरिता जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे प्रत्येकी ३००००/- (तीस हजार रुपये) आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यात श्रीमती सुनंदा बंडू गोंडे रा. नांदा तह कोरपना, सौ वैशाली भाऊजी पिंपळशेंडे रा हडस्ती तह. बल्लारपूर यांना आर्थिक मदत करण्यात आली. या प्रसंगी चनाखाचे उपसरपंच विकास देवाळकर आणि लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here