लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।
गडचांदूर,,,
औद्योगिक शहर गडचांदूर येथे शहरात असलेली सर्व देशी दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरीत करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनात केली आहे,
शहरातील अचानक चौक येथे देवी मंदिर तसेच मध्यवर्ती बँक,दवाखाने असून,या रस्त्याने शालेय विद्यार्थी जातात, दिवसभर वर्दळ असते येथील दारू दुकान डोकेदुखी ठरते आहेत,
स्टेट बँक ला लागून असलेल्या देशी दारू दुकानाचा बँकेत येणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक, व बिरसा मुंडा चौकात असलेल्या देशी दारू दुकानाचा प्रवाशांना तसेच परिसरातील नागरिकांना अतोनात त्रास होत आहेत,तेव्हा नगर परिषद ने तात्काळ नागरिकांच्या आरोग्य चा विचार करून शहरात असलेल्या सर्व देशी दारू दुकानांचे स्थलांतर गावाबाहेर करण्याबाबत मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे,
Home गडचांदूर / कोरपणा गडचांदूर शहरातील सर्व देशी दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरीत करा, ,,,,रोहन काकडे यांची...