कोरपना नगर पंचायतीमध्ये काँग्रेसचा ‘विजयरथ’

भाजपच्या ‘काका’ला नमवून नितीन बावणे यांची दमदार ‘एन्ट्री’

By : Shankar Tadas

कोरपना : कोरपना नगर पंचायतीच्या निवडणुकीत विजयराव बावणे यांनी पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे.
नितीन विजयराव बावणे यांनी राजकारणात दमदार ‘एन्ट्री’ करीत भाजपच्या ‘काका’ला चित केले आहे. काँग्रेस विरुद्ध इतर सर्व असा सामना असल्याने जिल्ह्याचे लक्ष कोरपना नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते.
आज, बुधवारी लागलेल्या निकालात काँग्रेसने तब्बल 12 जागा जिंकल्या असून बीजेपी, संघटना आणि इतरच्या गटाला फक्त 5 जागावर समाधान मानावे लागले आहे. शंकरराव गिरडकर यांची सून टीना गिरडकर यांना फक्त 8 मतांनी पराभव पत्करावा लागला असून गीता डोहे विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 1: नंदाताई बावणे – 233, विजय मसे – 106, प्रभाग क्रमांक 2 : मनीषा लोडे -245, नीता मुसळे 105, प्रभाग क्रमांक 3: नितीन बावणे 163, किशोर बावणे- 80, प्रभाग क्रमांक 4: इस्माईल शेख- 109, शुभम झाडे – 68, प्रभाग क्रमांक 5: शेख निसार – 108, अली सुहेल – 103
प्रभाग क्रमांक 6: देविका पंधरे 126, पूजा देरकर – 120, प्रभाग क्रमांक 7: मनोहर चन्ने – 80, शारीक अली-60, प्रभाग क्रमांक 8 : जोशना खोबरक-158, जोशना वैरागडे- 93, प्रभाग क्रमांक 9: मोहम्मद शेख- 86, पवन बुरेवार 79
प्रभाग क्रमांक 10, लक्ष्मण पंधरे – 133, सुभाष आत्राम- 92, प्रभाग क्रमांक 11, सोनू बुरेवार -109, वर्षा लांडगे-131, प्रभाग क्रमांक 12 : मंगला पारखी – 85, आशा झाडे- 163, प्रभाग क्रमांक 13: संगीता पंधरे 86, सविता तुमराम-108, प्रभाग क्रमांक 14: राधिका मडावी – 117, जया मेश्राम- 68, प्रभाग क्रमांक 15 : टीना गिरडकर-119, गीता डोहे -127, प्रभाग क्रमांक 16 : दिलीप जाधव -98, सुभाष हरबडे-110, प्रभाग क्रमांक 17: आरिफा शेख -98, बहिदा हुसेन -45, याप्रमाणे निकाल घोषित झाले आहेत. काँगेसच्या दणदणीत विजयाबद्दल आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी विजयराव बावणे आणि विजयी उमेदवार यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here