माजी आमदार निळकंठराव शिंदे यांचे कार्य प्रेरणादायी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

⭕*खासदार बाळू धानोरकर यांनी वाहिली अश्रुपूर्ण श्रद्धांजली*

चंद्रपूर : भद्रावती मतदान क्षेत्राचे तत्कालीन आमदार निळकंठराव शिंदे यांनी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकास साधला होता. त्यांनी भद्रावती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भद्रावती तालुक्यात प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोठे जाळे तयार केले होते. ते सन १९७८ मध्ये भद्रावती क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा कार्याची प्रेरणा घेऊन मी राजकारणात आलो. आज त्यांच्या श्रद्धांजली देताना खासदार बाळू धानोरकर यांनी भावोद्गार काढले.

यावेळी डॉ. विवेक शिंदे, प्रा. कार्तिक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, या क्षेत्रात माजी आमदार निळकंठराव शिंदे यांनी राजकारणात मला नेहमी मार्गदर्शन केले. अनेकदा ते स्वतः भ्रमणध्वनी करून त्यांनी मला सूचना करीत होते. मतदार संघात आमदार म्हणून काम करताना वेळोवेळी मार्गदर्शनाचा लाभ मला झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here