जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बल्‍लारपूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेत रिट्रोफिटींगसाठी ६ कोटी ६२ लक्ष ९४ हजार किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.*

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकराने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बल्‍लारपूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत रिट्रोफिटींग या योजनेला प्रशासकीय मान्‍यता मिळाली आहे. राज्‍य शासनाच्‍या पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाने दिनांक ११ जानेवारी २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये ६,६२,९४,३२३ इतक्‍या किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता प्रदान केली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर तालुक्‍यातील १८ गावांसाठी ग्रीड पाणी पुरवठा योजना मंजूर करण्‍यात आली होती. यातील बामणी दुधोली, भिवकुंड, चारवट, चुनाभट्टी, हडस्‍ती, जोगापूर, कळमना, कवडजई, नांदगांव पोडे, पळसगांव आणि विसापूर या गावात वाढीव वितरण व्‍यवस्‍था अर्थात रिट्रोफिटींग करण्‍यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत करण्‍यात येणार असून या योजनेच्‍या माध्‍यमातुन संबंधित गावातील प्रत्‍येक घराला नळजोडणी मिळणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर तालुक्‍यातील ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठा योजनेच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना पाणी पुरवठयासंदर्भात मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here