अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी.

लोकदर्शन ÷मोहन भारती

 

⭕काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केली आमदार, खासदारांना मागणी.
राजुरा :– राजुरा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात दिनांक ०९ व १० जानेवारी २०२२ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. नुकसान झालेल्या भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेत पिकांचे पंचनामे तातडीने करण्यासंदर्भात सुचना देण्यात याव्यात. अवकाळी पावसामुळे कापूस, धान, हरभरा, मिरची, तुर पिके खराब झाली असुन शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र महसूल प्रशासनाकडुन अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आल्याचे दिसुन येत नाही. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हरभन्याच्या पिकाचे नुकसान झाले असून पिकांवर अळया लागत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. करिता नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करावे आणि खराब झालेल्या पिकांची आर्थिक नुकसान भरपाई त्वरीत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी आमदार सुभाष धोटे आणि खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे विश्रामगृह राजुरा येथे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, आत्मा समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, विहिरगावचे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर, चनाखाचे उपसरपंच विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here