कळमना येथे स्व. नागोबा पाटील वाढई यांच्या स्मारकाचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथील दानशूर व्यक्तीमत्व स्वर्गीय नागोबा पाटील वाढई यांच्या स्मारकाचे भूमिपूजन त्यांचे पणतु कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर सुभाष वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. दानशूर कै. नागोबा पाटील वाढई यांनी त्या काळात लोकसेवेत स्वतःला वाहून घेतले होते. ग्रामीण भागातील लोकांना ते नेहमीच मदत करायचे. कोणाला कपड्यांची, कोणाला संसार उपयोगी साहित्याची, भुकेल्याला जेवणाची व्यवस्था करायचे एवढंच नव्हे तर त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे त्या वेळेस पुरण पोळी, बुंदीचे लाडु गावात आलेल्या रंजल्या गाजल्या लोकांना ते जेवण देत असत. अडचणीत असलेला माणूस त्यांच्याजवळ गेला तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे, वर्षाकाठी हे सगळी लोकं त्यांना भेटायला यायची तेव्हा दिवाळी प्रमाणे त्यांची सगळी सोय व्हायची, लुगडे, धोतर, पॅन्ट, साडी चोळी, दुपट्टा, लुंगी, बनियान देवून सेवा करायचे. वेळप्रसंगी स्वतःच्या डोक्यावरचा ऊलमाल, खांद्यावरची शाल अलगत देऊन टाकायचे अशा या महान समाजसेवक स्व. नागोबा पाटील वाढई यांचा पुतळा व स्मारक कळमना येथे उभारावे, त्यातून त्यांच्या विचारांचा आदर्श समाजासमोर निर्माण करण्याचा संकल्प त्यांचे पणतु कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी उचलला. त्यातूनच हा भुमीपुजन सोहळा पार पडला असुन लवकरच येथे उत्तम स्मारक उभे राहणार आहे.
या प्रसंगी भाऊजी पाटील वाढई, पोलीस पाटील बापूजी पाटील वाढई, माजी सरपंच गंगाधर पाटील वाढई, सुभाष पाटील वाढई, प्रभाकर पाटील वाढई, विठ्ठल पाटील वाढई, घनश्याम पाटील वाढई, मदन पाटील वाढई, जयवंता पाटील वाढई, दत्ताजी वाढई, दिवाकर वाढई, महादेव वाढई, विठ्ठल पाटील शिरसागर, माजी सरपंच अच्युतराव वांढरे, ऋषी उमाटे, भाऊराव चापले, एकनाथ भोयर, विठ्ठल विद्ये यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here