प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत खुनी षडयंत्रा रचणाऱ्या पंजाब सरकार निषेधार्त*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕भाजपा ओबीसी मोर्चाव्दारा आयोजित मानवी श्रृंखला कार्यक्रमात सहभागी व्हा – हंसराज अहीर*

चंद्रपूर – मान. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदीजी यांच्या पंजाब राज्यातील फीरोजपुर दौरा प्रसंगीच्या सुरक्षेदरम्यान खुनी षडयंत्रा रचणाऱ्या पंजाब सरकारच्या लज्जास्पद कृतीचा निषेध व विरोध करण्यासाठी राष्ट्रीय भाजपा ओबीसी मोर्चाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभर ‘‘मानवी श्रृंखला’’ कार्यक्रमाव्दारे निषेध निदर्शने कार्यक्रम दि. 12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमिवर चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा, तालुका व मंडळ स्तरावर मानवी श्रृंखलेव्दारा निषेध, निदर्शने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होवून पंजाब सरकारचा निषेध नोंदवावा असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केले आहे.
या निषेध कार्यक्रमाव्दारे प्रधानमंत्राी मोदीजींच्या सोबत देशभरातील संपूर्ण ओबीसी समाज भक्कमपणे उभा आहे असा संदेश देण्याकरीता हे आयोजन असून चंद्रपूर जिल्हा स्थानावर तसेच मंडळ स्तरावर गांधी चैक, नेताजी चैक, बाबुपेठ, बंगाली कॅम्प, तुकूम धांडे हाॅस्पीटल, सिव्हील मंडळ, जटपुरा गेट याठिकाणी होणाÚया मानवी श्रृंखला कार्यक्रमास राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर ग्रामिण देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, प्रमोद कडु, राजेंद्र गांधी, महापौर राखीताई कंचर्लावार, पूर्व महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर राहुल पावडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, स्थयी समिती सभापती संदीप आवारी, मनपा गटनेत्या जयश्री जुमडे, रवि गुरणुले, सुभाष कासनगोट्टुवार, दिवाकर पुद्दटवार यांचेसह भाजप, भाजयुमो, महिला आघाडी तसेच ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी प्रत्येक कार्यक्रमात 5 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहुन कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेणार असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्राी प्रदीप किरमे, शशिकांत मस्के, शैलेश इंगोले, महिला अध्यक्ष वंदना संतोषवार, भाजपा मंडळ अध्यक्ष बाळु कोतपल्लीवार, रवि लोणकर, संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकाव्दारे दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *