कोरपन्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


कोरपना :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यात मौजा लोणी लोणी फाटा ते लोणी गाव पर्यंत डांबरीकरण करणे १ कोटी ८५ लक्ष, माथा येथे जिल्हा परिषद शाळा एका खोलीचे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. माथा येथे स्थानिक निधी अंतर्गत १५ लक्ष रुपयाचे सामजिक सभागृह बांधकाम करणे, खनिज विकास निधी अंतर्गत २० लक्ष रुपयाच्या वाचनालय इमारतीचे बांधकाम करणे, आदिवासी शेत्रातील अर्थसंकल्पीय निधी सन २०-२१ अंतर्गत परसोडा ते रायपूर कोठोडा (खुर्द) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी, तर नक्षलग्रस्त निधीअंतर्गत परसोडा स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे ५ लक्ष, जनसुविधा निधी अंतर्गत आनंदराव चांदेकर ते तुकाराम नगराळे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बांधकाम करणे ४ लक्ष, इस्तारी गुंज वारते कष्ट जलद गेमवार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रेट इन रस्ता बांधकाम करणे ३ लक्ष, तांडा वस्ती सुधार फंड निधी अंतर्गत नरसिंग ट्रिपल दीवार ते पुरुषोत्तम बोकडे व केलम पवार ते महादेव भोयर यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बांधकाम करणे ३ लक्ष, खनिज विकास निधी अंतर्गत समाज मंदिर बांधकाम करणे १० लक्ष रुपये अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी उपसभापती सिंधूताई आस्वले, जि.प. सदस्य कल्पनाताई पेचे, विनाताई मालेकर, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, माजी
सभापती श्यामभाऊ रणदिवे, संभा पा. कोवे, कृ.उ.बा.स संचालक भाऊराव पा. चव्हाण, सरपंच रामभाऊ ठाकरे, जेष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, उपसरपंच अणिता काळे, घनशाम नांदेकर, विजय पिपळशेंडे, मुन दिनकरराव मुसळे, किशोर सातपुते, संजय पिपळशेंडे यासह गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here