चुनाळा गावाच्या स्वच्छतेसाठी कचरा कुंडी व कचरा संकलन गाडीची मागणी

By : shivaji Selokar

ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांनी केली मागणी

राजुरा, दि. 3 जानेवारी : तालुक्यातील चुनाळा गावातील स्वच्छता राखण्यासाठी गावामध्ये कचरा कुंडी व कचरा संकलन गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यांनी जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन कृषी व पशू संवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी सभापती उरकुडे यांनी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने व गावात स्वच्छता आबाधित ठेवण्यासाठी कचरा कुंड्या व कचरा संकलन वाहन तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले. लवकरच या बाबी उपलब्ध करून दिल्या जाणार असून चुनाळा गावाच्या विकासासाठी सदोदित प्रयत्न करणार असल्याचे उरकुडे यांनी सांगितले. रवी गायकवाड यांच्याकडून शासनाच्या विविध योजनेतून गावाच्या विकासासाठी निधीची मागणी करण्यात येत असून लवकरच विविध योजनेतून गावाच्या विकासाला निधी मिळणार असल्याचे सांगत, गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आमचे कर्तव्य असून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here