हिमायत नगर ते मारई पाटण रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्याची तात्काळ दुरस्थी करण्यात यावी:- गजानन पाटील जुमनाके

By : Shivaji Selokar

जिवती :- तालुक्यातील हिमायत नगर ते मारई पाटण रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

आमदार सुभाष धोटे यांनी जिवती येथे 2 कोटी रुपयांच्या रस्त्याच भूमिपूजन केल, जे की माजी आमदार संजय धोटे यांच्या कार्यकाळात 5 कोटी रुपये मंजूर झाले होते, जिवती नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता त्यांनी भूमिपूजन केल्याचा आरोप गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केला.

जिवती तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. पण आमदार धोटे यांनी नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता. जिवती येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन करून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले असल्याचे जुमनाके यांनी म्हटले.

ग्रामीण भागातील रस्ते मंजूर करून नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here