पुरुषोत्तमजी गोडे यांची तंटामुक्ती च्या अध्यक्ष पदी अविरोध निवड.

लोकदर्शन👉 मोहन भारती।

कोरपना . तालुक्यातील पारडी येथे ग्रामपंचायत पारडी ने प्रशासक राठोड व सचिव भोयर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 नोव्हेंबर ला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत आरोग्य. शिक्षण. पाणी व इतर विषयावर चर्चा करून नियोजन करण्यात आले. व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदाची निवड करण्यात आली श्री पुरुषोत्तम पाटील गोडे यांची अविरोध निवड करण्यात आली यांच्या नावाला ते ऐका स्वरांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी होकार दर्शवत श्री पुरुषोत्तम गोडे यांची तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची निवड झाल्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी गळ्यात पुष्पहार घालून गुलाल उधळत गावात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. गोडे यांनी संपूर्ण पारडी ग्रामवासी यांचे आभार मानले. गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीधरराव गोडे. बाबाराव गोडे. भारत कनाके दिवाकर डोके विनोद नेहारे व्यंकटराव गणेश भाऊ गोडे गोपाळ उदार दिवाकर पाटील आसुटकर किर्तन यांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here