वीज दिव्यांची रोषणाईने नागपूर रोडवर झगमगाट

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर


⭕आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण

चंद्रपूर, ता. ३ : दिवाळीच्या शुभ पर्वावर धनत्रयोदशीच्या दिवशीपासून नागपूर रोडवरील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते नागपूर रोडवरील आय लव्ह चंद्रपूरपर्यंत दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबांना वीज दिव्यांची रोषणाई लावण्यात आली असून, रात्रीच्या वेळी झगमगाटात सुरू झाला आहे.
वीज दिव्यांच्या रोषणाईचा लोकार्पण सोहळा २ नोव्हेंबर २०२१ रोजी आमदार तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्विच ऑन करून झाले.

संजय गांधी मार्केट, नागपूर रोड येथे आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय कंचर्लावार होत्या. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष ङाॅ. मंगेश गुलवाङे, सभागृह नेता देवानंद वाढई यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here