बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्काराचा इशारा

By : Devanand Sakharkar
चंद्रपूर : शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण मागण्यावर वारंवार निवेदन देऊनही शासनाने योग्य ती दखल घेत नाही. शासनस्तरावर यासंदर्भात अनेकदा बैठका झाल्या पण त्याबद्दलचे शासनादेश अजूनही काढले नाही. त्यामुळे याहीवर्षी महासंघ व विजुक्टाने पुन्हा एकदा 12 वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरकारला पत्राद्वारे दिला असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रविण चटप, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, जिल्हा संघटक प्रा. महेश मालेकर, प्रा. मानकर, प्रा. बारसागडे, प्रसिद्धी प्रमुख प्रा. नामदेव मोरे उपस्थित होते. सदर निवेदनात, 2005 पूर्वी अंशतः अनुदानित शाळांवर रुजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा मुद्दा हा हक्काचा असतानाही शिक्षकांना तो लागू करण्यात आला नाही मात्र इतर शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला. तसेच 10, 20, 30 वर्षानंतर मिळणारे आश्वासित प्रगती योजना शासकीय कर्मचा-यांना लागू पण शिक्षकांना नाही. अघोषित उच्च माध्यमिकला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कमवि.ला प्रचलित अनुदानसूत्राने 100%अनुदान द्यावे. विनाअनुदानितकडून अनुदानितमध्ये बदली स्थगिती उठवावी. पायाभूत पदांना मान्यता व आय टी विषयाला अनुदान द्यावे. शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत. कमवि तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न २१ विद्यार्थी व महाविद्यालय संलग्न ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावेत. एम.फिल.,एम.एड.,पीएच.डी. धारकांना वेतनवाढ द्यावे. उपदानाची रक्कम २०लाख करावी निवृत्तीचे 60 वर्ष करावे. अशंतः अनुदानित कर्मचारी यांचे व DCPS/NPS हिशेब सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकित हप्ते त्वरित द्यावेत.
घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढवावे , उपप्राचार्य यांना वेतन वाढ द्यावी, शून्य कार्यभारा शिवाय शिक्षकाला अतिरिक्त करू नये, अशैक्षणिक कामे देऊ नये या व इतर मागण्यांकरिता जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन सादर केले
शिक्षक समस्यांची तीव्रता विचारात घेता सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024 ला नागपूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर प्रचंड धरणे देऊन आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातील उच्च माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण चटप, सचिव प्रमोद उरकुडे व समस्त जिल्हाकार्यकारिणी व पदाधिकारी यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *