ईको-प्रोचे घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्यमधील कर्मचारी नियुक्तीकरिता “मानवी साखळी सत्याग्रह”

by : Shankar Tadas

चंद्रपूर: इको-प्रो तर्फे हिवाळी अधिवेशनच्या नवव्या दिवशी, नववे सत्याग्रह करीत घोडाझरी व कन्हारगाव अभयारण्य घोषित होऊन अनुक्रमे पवणे सहा तर पावणे तीन वर्ष होऊन सुद्धा पदस्थापना न झाल्याने अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती तात्काळ करण्याची मागणी तसेच दोन्ही अभयारण्य मधील पर्यटनाचे मॉडल गावाच्या संपूर्ण विकासाभिमुख बनविण्याची मागणीकरिता आज “मानवी साखळी सत्याग्रह आंदोलन केले.

जिल्हात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पुर्व-उत्तर दिशेकडील अत्यंत महत्वाच्या वन्यप्राणी भ्रमणमार्गात ५ वर्षाआधी (२३ मार्च २०१८) घोषीत झालेले ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनक्षेत्रातील ‘घोडाझरी अभयारण्य’ व ताडोबाच्या दक्षिणेकडील वन्यप्राणी भ्रमणमार्गात मध्य चांदा वनविभाग अंतर्गत असलेल्या वनक्षेत्रातील ‘कन्हारगांव अभयारण्य’ २ वर्षाआधी (२१ मार्च २०२१) घोषीत होउन सुध्दा अदयाप वन्यप्राण्याच्या दृष्टीने व्यापक वन्यजीव व्यवस्थापनाच्या कामास सुरूवात झालेली नाही. सोबतच सभोवतालच्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने, येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुध्दा कार्यास सुरूवात झालेली नाही. कारण यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ म्हणजे अधिकारी-कर्मचारीचे पद वर्ग करण्यात आलेली असली तरी त्यावर कर्मचारी यांची नियुक्ती अदयापही करण्यात आलेली नाही. यामुळे वन्यप्राणी व्यवस्थापन, अभयारण्या सोबतच या परिसरातील गांवाचा सुध्दा विकास खुंटला आहे.

घोडाझरी व कन्हारगांव अभयारण्य दोन्ही ताडोवा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर व्यवस्थापनाकडे हस्तांतरण करून, याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. कन्हारगांव अभयारण्य घोषीत होउन दोन वर्ष अधिक काळ लोटुन सुध्दा पदे वर्ग करण्यात आलेली असली तरी कर्मचाऱ्यांची पदस्थापना अदयाप करण्यात आलेली नाही. कन्हारगांव अभयारण्याकरीता एकुण ४६ पदाची गरज असतांना गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील ११ पदे वर्ग करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ४ पदाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. तर उर्वरीत ३५ पदाबाबत काहीच निर्णय नाही. घोडाझरी अभयारण्याकरीता एकुण २१ पदांवर अधिकारी-कर्मचारी नियुक्तीची आवश्यकता असताना पाच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी सर्व पदे रिक्तच आहे. दोन्ही अभयारण्ये ताडोबा बफर कडे व्यवस्थापनासाठी असले तरी मुख्यालयापासुन अंतर बरेच लांब असल्याने या अभयारण्याचे कार्यालय अभयारण्यलगतच्या तालुकाच्या ठिकाणी करणे आवश्यक असुन घोडाझरी करीता ‘नागभीड’ तर ‘कन्हारगांव’ करीता गोंडपिपरी संयुक्तीक ठरेल.

*दोन्ही अभयारण्य पर्यटनाचे स्वरूप सहजीवन निर्माण करणारे असावे*
चंद्रपूर जिल्हयात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असुन त्याची किर्ती सर्वदुर आहे. पर्यटन सुध्दा मोठया प्रमाणात सुरू असुन हमखास वाघांचे हमखास दर्शन करीता ओळखले जाते. घोडाझरी व कन्हारगांव अभयारण्य मध्ये पर्यटनाचे वेगळे मॉडल निर्माण करण्याची संधी असुन जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संर्घर्षाच्या पार्श्वभुमीवर जे वन्यप्राणी व गावकरी यांचेतील सहजीवन अधिक योग्य प्रकारे विकसीत होउ शकेल. आज जिल्हयात मानव-वन्यप्राणी शिगेला पोहचला आहे. वाघ, वन्यप्राणी व वनविभाग पर्यायाने शासन यांचेविषयी नकारात्मक भावना वाढीस लागत आहे. या अभयारण्याच्या परिसरातील गावांचा सर्वागीण विकासात या पर्यटनाचा हातभार पुर्णतः असावा या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.

आज ताडोबात येणारे पर्यटकांचा सर्वाधिक पैसा हा रिसोर्ट व निवास व्यवस्थेवर खर्च होतो, ताडोबाला सफारी बुकीगचे मिळणारे फि ही एकच स्त्रोत असतो. एखादया पर्यटकाच्या एकुण खर्चाच्या तुलनेत कमी असतो, सर्वाधिक खर्च हो रिसोर्ट व जिप्सी यावर खर्च होतो. खरेतर रिसोर्ट, जिप्सी यामधुन येणारा पैसा सभोवतालच्या सर्व इको डेव्हलपमेंट समीती चे एक मॉडल तयार करून त्याचे कमुनीटी होम स्टे व रिसोर्ट व कमुनिटी जिप्सी असल्यास या पर्यटनातुन येणारा सर्व प्रकाराचा पैसा या संपूर्ण गावातील युवकांना रोजगार तसेच गांव विकासासाठी वापर करणे संयुक्तीक ठरणार आहे. या पर्यटनातून फक्त नी फक्त “गांव आणी गावकरी” यांचा विचार होणार असल्याने येत्या काळात या ‘हिरवे उदयोग/प्रकल्प असणारे अभयारण्यकडे पाहण्याचा दृष्टीकोनात बदल येणार व सहजिवन प्रस्थापित करण्यास नक्कीच यश मिळेल.

आज हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या नवव्या दिवशी, इको-प्रो तर्फे नववे सत्याग्र/ आंदोलन करीत घोडाझरी व कन्हारगांव हे घोषीत झालेले अभयारण्यांना नवसंजीवणी देण्यास, या भागातील गांवाचा विकास करण्यास तात्काळ पद नियुक्ती करण्यासाठी, आणी या अभयारण्याच्या पर्यटन विकासातुन गांवाचा विकास साधणारा लोकाभिमुख पर्यटन मॉडल बनविण्याचे मागणीकरीता ‘मानवी साखळी सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. यात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, अब्दुल जावेद, राजू काहिलकर, प्रकाश निर्वाण, राजू हाडगे, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, बंडू दुधे, प्रितेश जीवने, जितेंद्र वाळके, भूषण ढवळे, सचिन धोतरे, सुनील मिलाल, निलेश दौडकर, लोकेश भलमे, भारती शिंदे, योजना धोतरे, शारदा काहिलकर, विशाखा लिपटे आदी सहभागी होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *