Home
Home Breaking News जिल्हास्तरीय एथलेट्रिक्स स्पर्धेत इन्फंट च्या विद्यार्थ्यांची निवड.

जिल्हास्तरीय एथलेट्रिक्स स्पर्धेत इन्फंट च्या विद्यार्थ्यांची निवड.

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लीश हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय एथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. १७ वर्षे तसेच १४ वर्ष या वयोगटातून या स्पर्धा घेण्यात आल्या. यात १०० मीटर धावणे – ओमप्रकाश टोंगे, २०० मीटर धावणे – हुमान काझी तसेच ११० मीटर हडल रेस – यामध्ये वम्शी कासर्ला या विद्यार्थ्याचा समावेश आहे. ५००० मीटर धावणीत विशांक साळवे ने प्रथम स्थान मिळविले असून प्रणय कोरवते ने द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. ४०० मिटर रिले स्पर्धेत ओमप्रकाश टोंगे, निशांत गोहणे, विशांक साळवे, हुमान काझी, गोला फेक स्पर्धेत ‘राखी उत्तरवार तर लांब उडीत पंकज लाडके या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर विजय मिळवून शाळेला जिल्हास्तरीय ॲथलेटिक स्पर्धांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत घोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजूषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे शुभम बन्नेवार, हर्षल क्षीरसागर आदिंनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here