इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी दिली सास्ती खुल्या कोळसा खाणीला भेट

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या वतीने इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सास्ती खुल्या कोळसा खाण क्षेत्राला भेट देऊन तिथे चालणारे कोळसा उत्खनन, त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान, कोळसाची ने आन कशी होते, त्याचा उपयोग कुठे कुठे आणि काय होतो, खान कामगारांचे महत्त्व अशा अनेक विषयांवर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना रशियन मशीन दाखविण्यात आली. या मशीनीचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ५०० लोकांचे काम ती एकटी करते अशी माहिती मिळाली.
या प्रसंगी सास्ती खूली कोळसा खाणीत कार्यरत नितीन झा, विजय भामरे, यादव शंपलशेट्टीवार, प्रशांत रामटेके (ब्लास्टी ऑफीसर) जी.ए.खील (डीसपॅच मैनेजर) यांनी विद्यार्थ्यांना आपला परिचय सांगून इथे होणाऱ्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील या भेटीत उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत सर्व माहिती समजून घेतली. हा उपक्रम शाळेचे संचालक अभिजीत धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. उपक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, वर्गशिक्षिका सौ. रामकली शुक्ला, विषय शिक्षक सुशील वासेकर व चांगदेव पोतराजे यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *