जवाहर गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम : ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा  :– जवाहर गणेश मंडळ राजुरा च्या वतीने सामाजिक दायित्व स्विकारून मागील ३० वर्षापासून विविध लोकोपयोगी उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या वर्षी मंडळाचे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामिण रुग्णालय चंद्रपूर, यांच्या संयोजनात रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी जवळपास ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंडळाचे वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी जवाहर नगर गणेश मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील देहारकर, उपाध्यक्ष भुवन काळे, सचिव प्रफुल उरकुडे, सदस्य रामेश्वर ढवस, अमोल खिरटकर, विलास खिरटकर, गौरव दवंडे, साहिल बोबडे, कार्तिक बोबडे, आकाश पाचभाई, प्रणव बोबडे, बंडू बोढे यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here