इन्फट काॅन्व्हेंट येथे शिक्षक दिवस उत्साहात.

लोकदर्शन 👉 मोहन.भारती

राजुरा :– इन्फंट जिसस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती आणि शिक्षक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गीत, संगीत, नृत्य, नाटिका, खेळ इत्यादी विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. शेवटी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भुमिका घेवून शालेय प्रशासन सांभाळले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अंसारी यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन समिहा अंसारी, अंश गुरले, स्वरा चन्ने, क्रांती लिहितकर यांनी केले तर आभारप्रदर्शन भार्गवी वैद्य हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here