इन्फंट काॅन्व्हेंट येथे जन्माष्टमी उत्साहात : चिमुकल्यांनी साकारल्या राधाकृष्णाच्या वेषभूषा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे जन्माष्टमीनिमित्त लहान मुलांकरिता राधाकृष्ण वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला, मुलांनी राधाकृष्ण विषयी त्यांच्या शब्दात माहिती दिली, नृत्य सादर केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती सिमरनकौर भंगू, मुख्यध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्री प्रायमरी चे शिक्षक सीमा सिंग, निता जक्कनवार, वरलक्ष्मी इररगुराला, जयश्री झिलपे यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here