महिला काँग्रेसने बांधल्या पोलीस, व न. प. कर्मचाऱ्यांना राख्या.

लोकदर्शन.👉 मोहन.भारती

राजुरा :– रक्षाबंधन या पावन पर्वाचे औचित्य साधून राजुराb महिला काँग्रेसच्या वतीने नगर परिषद व पोलीस स्टेशन राजुरा येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात स्वच्छता राखण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या राजुरा नगर परिषदेच्या सफाई कामगार, आरोग्य विभागाचे व अन्य कर्मचारी आणि माताभगनी तसेच सर्वांचे खलप्रवृत्तींपासून रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.
या प्रसंगी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदा जेणेकर, सेवादल सचिव सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, मिता बानकर, कामिनी उइके, शुभांगी खामनकर, ज्योती शेंडे, वर्षा कानकाटे, संगीता धोटे, नमिता भटारकर यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here