Home
Home Breaking News अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवरपुर तर्फे भोयगाव येथे 150 मीटर नाली बांधकामाचे...

अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवरपुर तर्फे भोयगाव येथे 150 मीटर नाली बांधकामाचे भूमिपूजन

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक नेहमी आपल्या दत्तक गावाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष ठेवत असते यावर्षी भोयगाव सरपंच यांच्या विनंतीला मान देत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी अवारपूर चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष श्री. गौतम शर्मा व प्रशासन व कर्मचारी संबंध विभाग प्रमुख श्री. नारायण दत्त तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली 150 मीटर नाली बांधकामाचे उद्घाटन भोयगावचे सरपंच श्रीमती शालिनी बोंढे यांच्या हस्ते दिनांक ०१ मे २०२३ ला करण्यात आले. यावेळेस सी एस आर चे सचिन गोवारदिपे, भोयेगावचे उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते. या नाली बांधकामामुळे गावातील सांड पाण्याचे नियोजन करता येईल असे गावकऱ्यांनी मत व्यक्त केले.
या कार्याला सुरुवात होण्याकरिता सी.एस.आर चे प्रमुख प्रतीक वानखेडे, सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदळे यांनी अथक प्रयत्न केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here