Home
Home Breaking News इन्फंट च्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचे धडे. ⭕विद्यार्थ्यांनी शहरातील विविध कार्यालयांना दिली...

इन्फंट च्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचे धडे. ⭕विद्यार्थ्यांनी शहरातील विविध कार्यालयांना दिली भेट : जानून घेतली कार्यप्रणाली.

  • लोकदर्शन 👉मोहन भरत

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी येथील शिक्षक हिरिरीने पुढाकार घेत असून शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाच्या अशा राजुरा येथील तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती, बँक, पोस्ट आॅफीस इत्यादी संस्थांच्या कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाज कशा पद्धतीने चालते, त्यांच्यामार्फत शासनाच्या कोण कोणत्या योजना चालतात, तालुका स्तरावर प्रमुख अधिकारी कोण असतात, सर्व सामान्यांना याचा कसा उपयोग होतो अशा विविध विषयांची माहीती विद्यार्थ्यांना देण्यात आली. एकंदरीत आजच्या स्पर्धेच्या युगात शालेय अभ्यासक्रमात शिकलेल्या ज्ञानाचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करता यावे, त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी, सर्वांगीण विकासला चालणा मिळावी या उद्देशाने शाळेचे संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू यांच्या मार्गदर्शनाखाली इन्फंट कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी नुकतेच शहरातील विविध कार्यालयांना भेटी दिल्या. या प्रसंगी विविध कार्यलयाचे अधिकारी, कर्मचारी, इन्फंट कॉन्व्हेंट चे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here