गडचांदुरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर:-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या गडचांदूर शहरात मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र सण रमजान ईद (ईदुल फितर)मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.सकाळी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन येथील रज़ा मशिदीचे इमाम हसनैन रज़ा यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह येथे ईदची विशेष नमाज पठण केली.यामध्ये मुस्लिम बांधवांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.यावेळी चिमुकल्यांचा उत्साह वाखानण्याजोगा होता.ईदच्या सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्याचे पहायला मिळाले.राकाॅचे राजूरा विधानसभा प्रमुख तथा माजी जि.प.सभापती अरूण निमजे,भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे,गरसेवक रामसेवक मोरे,संदीप शेरकी यांनी ईदगाह येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच पोलीस विभागातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.एकुणच हा सण मोठ्या उत्साह व शांततेत पार पडला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *