उरण तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३२वी जयंती उत्साहात साजरी.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२३ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे आरपीआय तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण मुख्याधिकारी राहुल इंगळे, उरण पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, मोरा पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, दलित मित्र मोरेश्वर भोईर, कौशिक शाह, रवी भोईर, दैलत शेठ, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, सायली म्हात्रे, चिंतामण गायकवाड, रोहित पाटील, लंकेश ठाकूर, अमृत शेठ, भूपेन घरत, प्रकाश ठाकूर, संतोष पवार, मधुकर भोईर, सुरेश पोस्टतांडेल, नंदू लांबे, नरेश रहाळकर , चंद्रकांत गायकवाड, नंदकुमार पाटील आदीसह मान्यवर उपस्तित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. यामुळे मागासवर्गीय समाजसह इतर समाजातील नागरिकांसह आरपीआय तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांचा नेतृत्वाखाली राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक सिद्धार्थनगर बौद्धवाडा मोरा येथून उरण नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे येऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, यांच्यासह सिद्धार्थ नगर नागनाथ गजधाने उच्चपा दहिसर, राजरत्न गायकवाड, परशुराम शिवशरण, शबाना शर्वे, बसवराज दहिसर, धुळप्पा बनसोडे, प्रफुल साबळे, वाल्मिकी, सुनील कोल्हे, लख्खन गायकवाड, चंद्रकांत गजधाने, सुरज गजधाने, रतन साबळे, प्रकाश भोसले, ऍडव्होकेट सुभाष बनसोडे, दिनेश गायकवाड, संतोष मोघे, संघर्ष नगर मांगीर देव खलील शेख, लाल शेख, लक्ष्मण वाल्मिकी, दीपक साबळे, जयभीम झळकी, महेश कदम, बाबू दुर्गांना, हनुमंता पोतेनैऋ, दीपक बल्लूरंगी, प्रकाश धसाडे, सागर पोतेनेरु, सुभाष बुलंद, प्रशांत भागा, राकेश गायकवाड, रवी आरेकर, प्रकाश गुलद, स्वप्नील साळवे,एन जी एल गेट अध्यक्ष देवेंद्र कोळी, करण कांबळे, अमर कऱ्हाळे, हेमंत मुदर, अरविंद थोरात, खाजुद्दीन शेख, चारफाटा भानुदास झिने, शैलेश मूलके, अशोक मूलके,लहू शिंदे, बौद्धवाडा अध्यक्ष विशाल कवडे, अनिल कासारे,धनेश कासारे, मंगेश कासारे, शिवाजी कासारे, सागर मोहिते, सुनील जाधव, कुणाल जाधव, मनोज ओव्हाळ, सतीश तायडे, आकाश कांबळे, विश्वनाथ जाधव, अमर गायकवाड ,आकाश कवडे, अनिकेत गायकवाड, साहिल गायकवाड, अतिश गायकवाड, महेश गायकवाड, आशिष गायकवाड, करण गायकवाड, दीक्षित गायकवाड आदींसह सिद्धार्थनगर मोरा, संघर्षनगर भवरा, मांगीरदेव, बौद्धवाडा, चारफाटा, एनजीएल गेट भीम नगर, सावित्री बाई फुले, नाईक नगर तसेच उरण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *