कोरपना, जिवती येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक : भाजपच्या विनोद नवलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना आणि जिवती तालुक्याचा दौरा करून दोन्ही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आणि व्यापक जनसंपर्कासह पक्ष बळकटीसाठी एकजुटीने कामाला लागण्याच्या सुचना उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या, शेतकर्‍यांच्या समस्या आपण नेहमीच प्राधान्य क्रमाने सोडवतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बाजर समितीमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अधिक संधी कशी मिळेल यासाठी परिश्रम घेतले पाहिजे असे आवाहन केले. या प्रसंगी कन्हाळगांव चे उपसरपंच तथा भाजपचे महत्त्वाचे कार्यकर्ते विनोद नवले यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृतावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शाल, श्रीफळ आणि काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन आ. धोटे यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी दत्त मंदिर देवघाट, कुसळी येथील हजरत हाजी अली रहमान उर्फ दुल्हेशाह वली, संत जगन्नाथ बाबा देवस्थान तुकडोजी नगर या सर्व ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
या प्रसंगी कृ. उ. बा. स. माजी सभापती श्रीधरराव गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी जि प सदस्य सिताराम कोडापे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, माहीला काँग्रेस तालुकाध्यक्षा आशाताई कसारे, मुरलीधर बल्की, सरपंच नयना शिंदे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, शंकर पेचे, भारत चन्ने, रसूल भाई, संजय जाधव, अनिल गोंडे, भाऊजी चव्हाण, भोजू पा मडावी, माधव डोईफोडे, सरपंच सिताराम मडावी, नामदेव जुमनके, अजगर अली, वंदना बल्की, विठ्ठाबाई देवाळकर, गणेश गोडे, सचिन मालेकर, प्रकाश मोहुर्ल, तसेच दोन्ही तालुक्यातील काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *