डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विश्वरत्न फाउंडेशन मिरज. तर्फे मोठ्या उत्साहात साजरी

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विश्वरत्न फाउंडेशन मिरज. मार्फत मोठ्या उत्साहात साजरी झाली. साडे नऊ वाजता ध्वजारोहण ज्येष्ठ सदस्य वसंत आबा लोंढे यांच्या हस्ते पार पडले. दिप प्रज्वलन संस्थेचे सदस्य मोहन सगरे , दादासाहेब गायकवाड, पांडुरंग मोटे , ज्ञानु आठवले, संभाजी आठवले, केशव आठवले, चंद्रकांत होवाळे यांच्या हस्ते झाले. व प्रतिमा पूजन अध्यक्ष मा. बापूसाहेब माने व विश्वरत्न फाउंडेशन चे अध्यक्ष मा. चंद्रकांत खरात यांच्या शुभ हस्ते पार पडले. व प्रास्ताविक व स्वागत कार्याध्यक्ष यशवंत सावंत यांनी केले. अनिस चे राज्य कार्यवाहक भास्करराव सदाकळे यांनी चमत्कार व बुवाबाजी यावर प्रयोगासह व्याख्यान दिले. माने सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्मावर लोकांचे प्रबोधन केले. 10 वी व 12 वी मध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व स्पर्धेमधील विजेत्यांचा सन्मान ट्रॉफी देऊन उपाध्यक्ष सागर आठवले किशोर वाघमारे, विष्णू मोरे , सचिन मोरे , अमोल पाटील यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनायक कांबळे सर यांनी केले. आभार अध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी केले. स्नेहभोजण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *