



लोकदर्शन चिपळूण 👉;राहुल खरात
राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या चौपदारीकरणाच्या कामातील मौजे परशुराम ता. चिपळूण अनेक कामे प्रलंबित आहेत
परशुराम बस थांबा येथे अंडरपास बांधणे व सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करणे,.
मौजे परशुराम येथील डोंगर पोखरला गेला असल्याने डोंगरावरील घरांच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी RCC संरक्षक भिंत बांधणे.
परशुराम व पेढे या गावांना जोडणारी मुख्य पायवाट(पाखाडी) जी पायवाट श्री देव परशुराम व श्री देव धावजी यांची पालखी नेण्यासाठी, शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी, शेतकरी शेतावर जाण्यासाठी व ग्रामस्थ चिपळूण येथे जाण्यासाठी वापरतात या वाटेला फूटओव्हर ब्रिज तातडीने बांधणे.
परशुराम बस थांबा येथे गावात येण्याजाण्यासाठी तात्पुरती परियायी व्यवस्था करणे.
या सर्व मागण्यांसाठी सन्माननीय खासदार साहेब यांचे अध्यक्षतेखाली महामार्ग अधिकारी यांचेशी दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी चर्चा करण्यात आली होती. सदरबाबत कोणतीही कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात आलेली नसल्याने आज दि. ०३ एप्रिल २०२३ रोजी मा. श्री विनोदजी झगडे, तालुकाप्रमुख चिपळूण, शिवसेना यांचे अध्यक्षतेखाली विभागप्रमुख श्री. सचिन शेट्ये, परशुराम ग्रामपंचायत सरपंच सौ. गायत्री जोगले, उपसरपंच श्री. प्रणित गुरव, संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे विश्वस्त श्री अभय सहस्रबुद्धे, ग्रामपंचायत सदस्य श्री जयदीप जोशी, सौ. विजया तळेकर, सौ. अनुक्षा खळे, , श्री पांडुरंग येसरे, श्री शंकर कानडे, श्री. विलास पाटील, श्री मकरंद विद्वांस, श्री दीपक सकपाळ श्री बाळकृष्ण गुरव, श्री रुपेश मुंढेकर इत्यादी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. महामार्ग विभागाकडून श्री दुर्गे यांना पाठविण्यात आले होते. व बाकी सर्व महामार्ग अधिकाती यांनी येण्याचे नाकारले. श्री दुर्गे यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने आज परशुराम घाटातील महामार्ग विभागाचे काम ग्रामस्थांनी श्री विनोदजी झगडे यांच्या अध्यक्षतेखाली बंद केले. जो पर्यंत परशुराम ग्रामस्थांच्या वरील सर्व रास्त व मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत व कमला सुरुवात केली जात नाही तो पर्यंत परशुराम घाटातील महामार्गाचे पुढील काम होऊ दिले जाणार नाही याचा इशाराही देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी परशुराम बस थांबा येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे व महामार्ग अधिकारी यांची वाट पाहत शांततेत आंदोलन करीत आहेत.