आटपाडी – बोर्डिंग* *आयु : विलास खरात*

 

लोकदर्शन 👉 राहुल.खरात

आटपाडी येथील पुर्वश्रमीच्या महार समाजाचा व्यवसाय शेती व गवंडी
कामवाचा होता. गवंडी कामात अनेक पट्टीचे कुशल कारागीर होते दगडी घडीव
बांधकाम सुबक पध्दतीने करीत असत. या भागातील अनेक घरे, वाडे, प्रवेशव्दारे
इत्यादी बांधकामे त्यांनी चांगल्या पध्दतीने केलेली आहेत. उदा. आटपाडी येथील
सन १९३७ साली बांधलेली श्री भवानराव म्युनसिपलची इमारतीचे दगडी बांधकाम
केलेली आहेत. सदरच्या समाज मोठया प्रमाणात वास्तव्यास होता. शंभर घरांचा
उंबरा होता असे आवर्जून म्हणत असत. पुर्वाश्रमीच्या महार समाजाची आडनांवे
खरात, मोटे, अशी आहेत त्यांना तीन गावची वतने होती. खराताना आटपाडी,
कामथ, व बोंबेवाडी येथे जमिनीची वतने मिळालेली आहेत. तसेच मोटे यांना
आटपाडी तडवळे व खुनाटी मळा येथे वतनाची जमिन आहेत. खुनाटीमळयाचा
(पुजारवाडी) इतिहास जमिनी बाबत वेगळा आहे. सदरच्या मंडळीना कसबेकर असे
ही म्हणत असत सदरच्या मंडळीना इनामी जमिन असलेमुळे रब्बी हंगामातील
ज्वारी, गव्हु, व्हंडी, हरभरा, करडई इ. पिके घेवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत
असत. काहीची धाब्याची घरे होती काहीची झोपडी वजा घरे होती. व गवंडी
कामाच्या मजुरीवर आयुष्याची वाटचाल करत असत.

पुर्वाश्रमीच्या समाजात अशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त होते. परंतु परमपुज्य
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंढरपूर व दहिवडी येथील जाहिर सभा
ऐकल्या होत्या व त्याना समक्ष पाहिले होते. त्यांच्या समोरील भाषणाने भारावून
गेलेले होते त्यावेळी चालत सभा ऐकणे साठी आटपाडीहून गेले होते त्यामध्ये पांडा,
शेषाप्पा, धोंडी, कृष्णा, येताळा, संतू, आनंदा सखाराम, महादु, शंकर, ज्ञानू सदा
इत्यादी मंडळी सभा ऐकून आलेली होती. तसेच आटपाडीच्या तक्या मध्ये रात्रीच्या
वेळी कंदीलाच्या उजेडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी लिहलेली मुकनायक,
बहिष्कृत भारत, जनता, प्रबुध्द भारत हे वर्तमान पत्रे शंकरराव खरात औंध येथून
शाळेच्या सुट्टीमध्ये आटपाडीस आलेनंतर वाचून दाखवत
असत. पंढरपूरच्या
सभमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या चेह-याचे दर्शन झाल्यावर आटपाडीकरांच्या जीवनास
नवीन उर्जा निर्माण झाली त्याचे प्रत्येक वाक्य, शब्द वजनदार व समाजाच्या
उध्दारासाठी, प्रगतीसाठी मानवतेसाठी, गुलामगीरीच्या बेडया तोडणारे प्रत्येक शब्द
समाजाच्या हितासाठी बोलत असत. ते असेही म्हणत असत की एखादा चांगला
गवंडी इमारतीचे बांधकाम करीत असताना दगडास हातोड्यानी व टाकीन घडवून
योग्य ठिकाणी बसवून इमारतीचे बांधकाम करतो त्याच पध्दतीने येणा-या पिढीतील
मुलाना योग्य संस्कार देवून शाळेत घाला त्याना शिक्षण देणे, शिक्षण हे वाघीणीचे
दुध आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपले मुले शाळेत घालवीत असे बाबासाहेबानी
आवाहन सभेमध्ये केलेले होते. त्यामुळे सर्वाना शिक्षणाचे महत्व पटले होते.

सन 1956 रोजीच्या नागपूर येथील धम्म दिक्षेच्या कार्यक्रमास लांब असलेमुळे जाता
आले नाही. म्हणून सुर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांचे
अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते आटपाडी येथील तक्यामध्ये सन १९५८ रोजी
आटपाडीसह बत्तीस गावाच्या लोकांनी धम्म दिक्षेचा कार्यक्रम घेतलेला होता.
आटपाडीच्या तक्यामध्ये प्रथमच तथागत भगवान गौतम बुध्द परमपुज्य डॉ.
बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांचे तैल चित्रातील फोटो लावणेत
आले होते. त्यावेळी आटपाडी गावातून भैयासाहेब आंबेडकर यांना बैल गाडीत
बसवून भगवान गौतमबुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या व महात्मा फुले
प्रतिमेची भव्य मिरवणूक वाजतागाजत काढलेली होती. त्यामुळे समाजात
स्वाभीमानाचे नवचैतन्य प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेले होते समाज अशिक्षित
असला तरीही तो स्वाभिमानी व जागृत विचाराचा होत चालला होता.
सन १९५८ रोजी पुर्वाश्रमीच्या महार समाजाने बौध्द धम्माची दिक्षा घेतले
नंतर समाजामध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले होते. पूर्वी आटपाडीच्या तक्यामध्ये
मनोरंजनासाठी तमाशा होत असलेने पंचक्रोशीतील सर्वजण पाहणेसाठी येत असत.
भेदीक, भारुड, इत्यादी कार्यक्रम होत असत. रायरंदाचे उंट नाचवणे, सोंगाचा व
ढोंगाचा कार्यक्रम अप्रतिम करीत असत. धम्म दिक्षेनंतर तक्या मध्ये बुध्द वंदना
भिम वंदना होऊ लागल्या त्यामुळे आंबेडकरी विचारधारा प्रवाहित होऊ लागल्या
लोकांच्या जाणीवा जागृत होऊन शिक्षणाचे महत्व समाजाच्या लक्षात येवू लागले
होते. १४ ऑक्टोबर 1959 रोजी आटपाडीच्या तक्यामध्ये ३२ गावच्या बौध्द
समाजाची बोर्डिंग बाबत पहिली बैठक आयोजित करणेत आली होती त्या
बैठकीमध्ये प्रामुख्याने आटपाडी येथे विदयार्थीसाठी वसतीगृह सुरु करणेत यावे
जेणे करुन आटपाडी भागातील ३२ गावातील गरीब मुलांना शाळेतशिक्षण घेता
येईल मुलांची रहाणेची व शिक्षणाची सोय होईल आटपाडी येथील बौध्द समाजाने
पुढाकार घ्यावा संस्था स्थापन करुन शासनाकडून वसतीगृह मंजूर करुन घ्यावे
जेणे करुन या भागातील गोर गरीबाच्या मुलांचे शिक्षण होईल निवासाची सोय
होईल असा मुद्दा बैठकीत मांडला त्यास सर्वानी एकमुखी अनुमती दिली व आटपाडी
येथे विदयार्थ्यासाठी वसतीगृह काढणेचे सर्वानुमते ठरविणेत आले. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर साहेबानी सांगितल्याप्रमाणे वाटचाल सुरु आहे यांचेच समाधान बैठकीत
आलेल्या सर्वांच्या चेह-यावर दिसत होते.

आटपाडी येथील तक्यामध्ये ३ डिसेंबर १९५९ रोजी बौध्द सामाजातील
कारभारी मंडळीची बैठक झाली त्या मध्ये असे ठरले कि, आपल्या भागातील बहुजन
समाजातील मुलांचे शिक्षणाचे अल्प प्रमाण आहे गांवोगावच्या मुलांना प्राथमिक
शाळेत घालणे बाबत पालकांना विनंती आवाहन करुया विदयार्थ्यांना आटपाडी येथे
बोर्डिंगमध्ये येणेचे आवाहन करुया त्यांच्या राहणेची व जेवणाची सोय करुया
आटपाडी येथील भवानी विदयालयात त्यांना प्रवेश मिळवून देवूया व आटपाडी येथे
वसतीगृह काढूया असे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे
कार्यकारी मंडळ निवडण्यात आले.

१. सुकदेव पांडुरंग खरात

अध्यक्ष

आटपाडी

२. केरु पिराजी वाघमारे

सभासद

घाणंद

३. विठ्ठल तातु कदम

सभासद

घरनिकी

४. ज्ञानु रामचंद्र खरात

सभासद

आटपाडी

७. सदाशिव मारुती मोटे

६. आनंदा तुकाराम खरात

सभासद

आटपाडी

सभासद

वरील प्रमाणे कार्यकारी मंडळ सर्वानुमत निवडले नंतर संस्थेचे नाव

समाज विकास शिक्षण प्रसारक मंडळ असे

आटपाडी

ठेवण्यात आले व बोर्डिगचे नाव डॉक्टर आंबेडकर विध्यार्थी वसतीगृह आटपाडी
असे नामकरण करणेत आले व सदरची संस्था मा. असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ
सोसायटी कोल्हापूर यांचेकडे रितसर संस्था स्थापन करणेत आली त्याचा रजिस्टर
नंबर बॉम्बे / १०१ / S.S. T.R ने दिनांक ३० / ११ / १९६० रोजी नोंदणीकृत करुन घेतली व
वसतीगृह स्थापन करुन शासनास प्रस्ताव सादर करणेत आला व वसतीगृहासाठी
संस्थेचे अध्यक्ष सुकदेव खरात यांनी आपले राहते घर बोडींगसाठी दिले.

अधिकृत संस्था स्थापन झाले नंतर संस्थे तर्फे जाहिरात काढणेत आली
होती त्यामध्ये असे म्हटले होते की, मु.पो. आटपाडी, ता. खानापूर, जि. सांगली
येथील सर्व विदयार्थ्यास कळविणेत येते की आटपाडी येथे समाज विकास मंडळाने
डॉ. आंबेडकर विदयार्थी वसतीगृह हे सुरु झाले असून सदर वसतीगृहात
विध्यार्थ्यास राहणे, जेवण दिवाबत्ती औषधे वगैरे सर्व प्रकारची सोय मोफत केली
जाते. तरी गरजु गरीब विदयार्थ्यानी तारीख २०/०७/१९६१ चे आत अर्ज करावेत
अशा पध्दतीने जाहिरात आटपाडी भागातील ३२ गावात व सांगोला तालुक्यातील
काही गावात गावोगावी पोहच केली होती. जाहिरात पाहिल्या नंतर शिक्षण घेणा-
या गरिव २७ विदयार्थी यांनी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश
घेतला होता.

सदर संस्थेने २७ विदयार्थीचे बोर्डिगमध्ये प्रवेश झाले नंतर त्याची राहणेची
झोपण्याची, जेवणाची, अभ्यासाची सोय चांगल्या प्रकारे केली होती. व त्याचे
• आटपाडी येथील श्री भवानी विदयालय शाळेत अॅडमिशन सुध्दा करून घेतले होते.
वसतिगृहामुळे गरिब विदयार्थ्यांची निवासाची सोय झाली. आटपाडी येथे शिक्षण
घेणेची व्यवस्था झालेमुळे विदयार्थी त्यांचे पालक व बौध्द समाजात आनंदाचे व
समाधानाचे वातावरण निर्माण झाले. परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
सांगितल्या प्रमाणे समाज शिक्षणाकडे वळू लागला होता त्या मध्ये आटपाडी येथे
बोडींगची स्थापना झाली या बाबत सर्व स्तरात कौतुक होऊ लागले हाते.

आटपाडी येथील समाज विकास शिक्षण प्रसारक मंडळाने स्थापन केलेले डॉ.
आंबेडकर वसतीगृहात सन १९६१ रोजी प्रथम प्रवेश घेतलेल्या २७ विदयार्थ्याचे नावे
खालील प्रमाणे आहेत. १) वसंत नाथा भोरे इ. १० वी. २) वामन सैदा खरात इ. ९
वी, ३) तुकाराम मोतीराम वाघमारे इ. १० वी. ४) मधुकर मारुती पवार इ. १० वी.
(७) गजेंद्र भाऊ सावळे इ. १० वी. ६) संभाजी बाबा कांबळे इ. १० वी ७) विष्णु
विठोबा कांबळे इ. १० वी ८) सोमीनाथ कृष्णा कांबळे इ. १० वी ९) विष्णु ज्ञानु
वाघमारे इ. १० वी, १०) सोपान दादु भोरे इ. ९ वी, ११) शंकर कृष्णा मोरे इ. ९ वी,
(१२) शिवाजी कृष्णा मोरे ई. ९ वी १३) मधुकर तुकाराम सरतापे इ. ९ वी, १४) वसंत
तुकाराम चंदनशिवे इ. १० वी, १७) रावसाहेब परशुराम चंदनशिवे इ. ९ वी, १६)
धोंडीराम लिंगाणा खरात इ. ९ वी. १७) तानाजी आनंदा खरात इ. ११ वी, १८)
जगन्नाथ बंडू हेगडे इ. ८ वी. १९) प्रताप धोंडीबा वाघमारे इ. ८ वी, २०) शिवा तातू
देते इ. ८ वी, २१) ज्ञानु काशिनाथ सवने इ. ८ वी २२) आत्माराम निवृत्ती सावंत इ.
८ वी २३) रघुनाथ बाबा वाघमारे इ. ७ वी, २४) दादा कृष्णा वाघमारे इ. ७ वी २७)
यशवंत साधु वाघमारे इ. ३ री २६) जालिंदर भगवान हेगडे इ. ४ थी,
२७) रामा तानु भोरे इ. ११ वी हे सर्व विदयार्थी डॉ. आंबेडकर वसतीगृहात राहू
लागले शिक्षण घेवू लागले सदरचे बोडींग सुकेदव पांडूरंग खरात अध्यक्ष याचे
घरी सुरु केलेले होते.

आटपाडी व सांगोला भागातील गोरगरीब जनतेच्या मुलांची राहणेची,
जेवणाची सोय झालेली होती. विदयार्थी व पालकवर्ग समाधानी होता आपला
मुलगा डॉ. आंबेडकर बोर्डींग मध्ये राहून विदयालयात शिक्षण घेत आहे. हे आवर्जून
लोकाना सांगत असत वसतिगृहा जवळ पाण्यासाठी आड (लहान विहिर)
असलेमुळे विदयार्थी पहाटे उठून आडातील पाण्याने अंगोळ करीत असत काही
विदयार्थी
शुक्र ओढा लगतच असलेमुळे अंगोळीसाठी व कपडे धुणेसाठी जात असत.
डॉ. आंबेडकर बोडींगचे सपरीटेंडेंट म्हणून सदाशिव मरुती मोटे काम पाहात असत.
बोडींगच्या विदयार्थ्याकडून प्रार्थना, अभ्यास, सराव घेत असत संस्थेचे कार्यकारी
मंडळ वसतीगृहावर देखरेख व्यवस्थित करीत असत. विदयार्थ्याचे आस्थेवाईकपणे
चौकशी करीत असत. बोडींगच्या विदयार्थ्यांना स्वयंपाक करून घालण्याकरीता
पुतळाबाई कृष्णा खरात ही माऊली आनंदाने काम करीत असत तीस दरमहा पंधरा
रुपये मेहनताना देण्यात येत होता.

सदरच्या वसतिगृहाबाबत बौध्द समाजातील करभारी मंडळी व इतर मान्यवर
मंडळीनी बोर्डींग स्थापने बाबत व चालु करणे बाबत प्रचंड मेहनतीने कार्य केले
होते. त्यामध्ये पांडा, शेषाप्पा, धोंडी, येताळा, म्हादु, सैदा कृष्णा, सखरात सुखदेव,
ज्ञानू सुदाम सदा तातु आप्पा हे आघाडीवर होते. तसेच पंढरपूरचे सिद्राम बाबर
यांनी बहुमोल सहकार्य केले. त्याचबरोबर थोर साहित्यीक डॉ. शंकरराव खरात व
शिगांव सांगलीचे पी.टी. मधाळे साहेब यांनी सदर बोर्डिंग उभारणीसाठी अतोनात
कष्ट घेतले आहेत. या सर्वांचा एकच उद्देश होता या भागातील गोर गरीबांच्या
मुलांना शिक्षण मिळावे, शिक्षण घेवून समाजाचा विकास करावा व डॉ. बाबासाहेबानी
सांगितलेल्या मार्गानी समाजाने जावे अशी तळमळीची भावना आटपाडीतील बौध्द
सामाजातील मंडळींची होती.
: सन १९६०-६१ रोजी बोडिंगच्या विदयाथ्यांची राहणेची सोय झाले नंतर बौध्द
समाजाने प्रत्येक घरटी २ पायली ज्वारीचे धान्य बोर्डिंगच्या विदयार्थ्यासाठी संस्थेचे
अध्यक्ष सुकदेव खरात यांचेकडे जमा केलेले होते. संस्थेस शासनाचे अनुदान आले
नंतर बोर्डिंगच्या विदयार्थ्यासाठी ज्वारी, किराणा, भाजीपाला इत्यादी समान घेण्यात
आले होते. दिनांक ०४/०३/१९६१ रोजी श्री. कोंडीबा आप्पा गळवे रा. गळवेवाडी
यांचेकडून बोर्डिंगच्या विदयार्थ्यांना खाणेसाठी दोन ज्वारीची पोती (दोन मण ६४

शेर) दर ४२ रुपये ५० न. पै. प्रमाणे घेतली होती त्यांचे गळवे याना ८७/- पंच्याऐंशी
रुपये रोख दिलेची नोंद आहे. तसेच आटपाडी येथील किराणा दुकानातून खालील
प्रमाणे संस्थेने सामान किरणा दुकानातून घेतलेले होते. (दिनांक २४/११/१९६१)

१. गोडेतेल

२. रॉकेल

३. गुळ

४ शेर

१८ शेर-

२ शेर

दर

५० न.पै.

१० न.पै.

दर

८७ न.पै.

या तीन वस्तुचे पाच रुपये चौपन्न (५.५४) नये पैसे दिल्याची

नोंद आहे. दिनांक २४/११/१९६१ रोजी धान्य, किरणा, भाजीपाला घेतलेला आहे.

१. तुरडाळ
३ शेर दर १ रु. ७० न.पै.

२. तांदुळ
३ शेर दर १ रु. ५० न.पै.

३. खपलीगव्हु-

८ शेर दर १ रु. २५ न.पै.

४ शेर दर १ रु. २७ न.पै.

४. गव्हु
७. साखर-
२.७ शेर दर १ रु. २५ न.पै.

४.५०

४.५०

१० रुपये

०५ रुपये

०३.१२
६. गोडेतेल
६ शेर
दर रु. ७६ न. पै.

७.३२

भाजीपाला खर्च

२५ नये पैसे

१. आमटी भाजी

२. बटाटे

१ शेर

दर ५० न. पैसे

दर
३. लसूण

४. कांदे

२ छटाक

१ शेर २५

दर २५ नये पैसे

नये पैसे

डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विदयार्थ्याना भोजनाची सोय
योग्य प्रकारे केली जात होती. त्यामुळे विदयार्थ्याची संख्या वाढू लागली होती.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदयार्थी वसतिगृहात आटपाडी येथे सन १९६४
रोजी वसतिगृहात २४ नविन विदयार्थी भरती करणेत आले त्यांची नावे, शिक्षण,
गावे खालील प्रमाणे.

9.
मारुती निवृत्ती झोडगे इ. ११ वी माडगुळे, २. धोंडी लिंगाप्पा खरात इ.१० वी
बोंबेवाडी ३. पांडूरंग दामोदर काटे इ. ९ वी मंगेवाडी, ४. उत्तम रामचंद्र ऐवळे इ. ९
वी खवासपूर, ७. तुकाराम पांडूरंग ऐवळे इ. ९ वी खवासपूर, ६. शंकर राजाराम
खर्जे इ. ९ वी लोणवीरे, ७. म-याप्पा रामू भोसले इ. ९ वी खवासपूर, ८. ब्रम्हदेव
बाबा वाघमारे इ. ८ वी गळवेवाडी, ९. उत्तम सोमा वाघमारे इ. ८ वी पिंपरी खुर्द,
१०. बाबूराव दादू धांडोरे इ. ८ वी अजनाळे ११. दगडू ईश्वरा कांबळे इ. ८ वी पिंपरी
खुर्द १२. श्रीमंत विठोबा सावंत इ. ८ वी पिंपरी खुर्द, १३. लक्ष्मण येताळा सावंत इ.
७ वी अचकदाणी, १४. पांडूरंग सैदा खरात इ. ६ वी बोंबेवाडी, १५. सदाशिव विठोबा
केंगार इ. ७ वी अचकदाणी, १६. जगन्नाथ मारुती वाघमारे इ. ६ वी गळवेवाडी,
१७. विष्णु लक्ष्मण वाघमारे इ. ६ वी लिंगीवरे, १८. दुर्योधन बाबू खरात इ. ५ वी
बोंबेवाडी, १९. लक्ष्मण केरु ऐवळे इ. ७ वी बोंबेवाडी, २० गंगाराम गणपती विभूते
इ. ५ वी बोंबेवाडी २१. दामोदर शिवाजी विभुते इ. ६ वी बोंबेवाडी, २२. जगन्नाथ
शंकर जावीर इ. ८ वी लोटेवाडी, २३. गोपीनाथ गणू काळेबाग इ. ८ वी लोटेवाडी,
२४. निवृत्ती गणेश काळेबाग इ. ९ वी लोटेवाडी सदरच्या २४ विदयार्थ्यानी डॉ.
आंबेडकर विदयार्थी वसतिगृहात प्रवेश घेवून शिक्षण पूर्ण करीत होते.

सदरच्या वसतिगृहास अडी अडचणी निर्माण झालेस कार्यकारी मंडळ
आटपाडीच्या तक्यात सर्व बौध्द बांधवाची बैठक घेत असत. त्या बैठकीतून मार्ग
काढून बोर्डिंग व्यवस्थित चालवित होते. प्रशासकिय अडचणी निर्माण झालेस
: जिल्हास्तरीतय वसतिगृहाचे मंडळ काम करीत असत. म्हणून सांगली जिल्हा
वसतिगृह विकास मंडळ सांगलीने जिल्हयातील वसतिगृहात येणा-या अडी
अडचणी सोडविण्यासाठी दिनांक २७/०१/१९६४ रोजी सांगली जिल्हयातील सर्व
वसतीगृहाची परिषद माननीय नामदार राजाराम बापू पाटील उपमंत्री महसुल व
जंगल खाते महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या परिषदेस
मुख्य पाहुणे म्हणून माननीय नामदार वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्रीची महाराष्ट्र
राज्य हे उपस्थितीत होते. सदर परिषदे मध्ये डॉ. आंबेडकर विदयार्थी वसतिगृह
आटपाडीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुकदेव पांडूरंग खरात नवीन सुपरिटेंडेंट केरु
शिवाजी तोरणे सभासद म्हणून ज्ञानू खरात व सदाशिव मोटे हजर होते. त्यानी
वसतिगृह चालवताना येणा-या अडचणी समस्या सांगितल्या व आटपाडी येथील
डॉ. आंबेडकर वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दयावी अशी मागणी
केली होती. त्यावर मान्यवरानी समस्या सोडविणेचे अभिवचन दिले होते. सदरची
वार्षिक परिषद डॉ. बापट विदयार्थी वसतीगृह गाव भाग सांगली येथे झालेली होती.

अशा प्रकारे आटपाडी येथील समाज विकास शिक्षण प्रसारक मंडळाने सुरु
केलेले डॉ. आंबेडकर विदयार्थी वसतिगृह आटपाडी हे बौध्द समाजाने सुरु केलेले
पहिले बोर्डिंगची माहिती थोडक्यात आपणापुढे सादर केलेली आहे.
कळावे.

 

आपला,

आयु. विलास खरात
9284073277

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *