जयंतराव साहेब !, एलॉन मस्क यांच्या सहकार्याने आटपाडी तालुक्याला जगविख्यात उद्योग नगरी बनवा .* *♦️सादिक खाटीक यांचे आवाहन .*

 

लोकदर्शन.👉 राहुल खरात
आटपाडी दि . ५ जुलै.
जागतिक किर्तीचे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या सहकार्याने आटपाडी तालुक्याला जगविख्यात उद्योग नगरी साकारण्यासाठी आमदार जयंतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा . असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार *” एक तास राष्ट्रवादी साठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी “* या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या विसाव्या आणि आटपाडीतल्या सतराव्या गाव – प्रभाग भेटीच्या बैठकीत बोलताना सादिक खाटीक यांनी हे आवाहन केले .
भारतात उद्योगाला प्राधान्य मिळत नाही म्हणून नाराज होऊन चाललेल्या एलॉन मस्क यांच्या सारख्या उद्योगपतीला सन्मानाने महाराष्ट्रात निमंत्रीत करण्याचे काम त्यावेळी मंत्री असणाऱ्या जयंतराव पाटील यांनी पार पाडले होते . सर्व, सोयी, सुविधा देण्याचेही आश्वासन त्यांना जयंतराव पाटील यांनी दिले होते.भारतात केवळ जयंतराव पाटील यांनीच हे औदार्य दाखविले होते . ते एलॉन मस्क भारतात येत असल्याचे वृत्त काही तासांपूर्वी समजल्याने त्यापार्श्वभूमीवर मी ही मागणी करीत आहे . असे सादिक खाटीक यांनी प्रारंभीच स्पष्ट केले .
सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्याला, विकासाची मोठी ताकद मिळेल अशा समृद्ध, जिल्ह्याच्या ठिकाणी आढळणाऱ्या सोयी, सुविधा, सर्वच प्रशासकीय मुख्यालये आटपाडी शहराचे, आटपाडी तालुक्याचे भविष्यात वैभव ठरावेत. शेती, शिक्षण, आरोग्य, संरक्षण यांना चालना देण्याबरोबरच शासनाने आवश्यक जमीनींचे सत्वर अधिग्रहण करून त्या जमिनींचे मोल राष्ट्रीय महामार्गाच्या दराने प्रथम चुकते करीत दहा – पंधरा हजार एकरातील सर्वात मोठी उद्योग नगरी आटपाडी शहरालगत उभारावी . किंवा नेलकरंजी, धावडवाडी, खरसुंडी, वलवण, घरनिकी, पिंपरीबुद्रुक, विभूतवाडी – झरे दरम्यानच्या डोंगरालगतच्या विस्तीर्ण जमिनींवर अथवा नेलकरंजी, हिवतड , तळेवाडी, पात्रेवाडी, शेटफळे लगतच्या सरहद्दीला लागून , किंवा उंबरगाव, पिंपरीखुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, खानजोडवाडी, माडगुळे, लेंगरेवाडी, शेटफळे अशा टप्प्यावर ही उद्योग नगरी उभी राहू शकते का हे पहावे ? तसेच खरसुंडी, घाणंद, जांभूळणी, कामथ, मुढेवाडी, वाक्षेवाडी, निंबवडे, आवळाई, पळसखेल या दरम्यानचा पट्टा या उद्योग नगरीसाठी अनुकुल ठरतो का हे ही पहावे . देशात काही ठिकाणी उभारल्या जात असलेल्या आर्थिक कॉरीडोर च्या धर्तीवर ही उद्योग नगरी साकारली जावी . हजारो कोटींची गुंतवणूक, शेकडो उद्योगांचे प्रचंड जाळे, लाखो जणांना रोजगाराची संधी, १०० किलोमीटर परिसरात ओसंडून वाहणारी आर्थिक समृद्धी या उद्योग नगरीतून साध्य व्हावी . बारामती – आटपाडी – विजयपूर आणि कराड – आटपाडी – पंढरपूर या नव्या मार्गाची रेल्वे सुविधा, उद्योग नगरीला आवश्यक अशा सर्व पंचतारांकीत सोयी सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे समृद्ध विमानतळ, अनेक देशाना जोडणारी विमान वाहतूक, लाखो कोटींच्या उलाढाली इत्यादीतून आटपाडीतून जगाला मुंबई – पुण्याचे दर्शन घडावे . इतक्या उच्च कोटीच्या सोयी सुविधा या उद्योग नगरीत वास्तवात याव्यात . जगात सर्वात अधिक सौर – पवन उर्जा निर्माण करणारा भाग अशी आणखीची आटपाडी तालुक्याची नवी ओळख निर्माण करण्यात जयंतराव पाटील यांच्या सारखे चतुरस्त्र, अभ्यासू जाणकार नेतृत्वच यशस्वी ठरू शकते असा माझ्या सारख्याला मोठा विश्वास आहे . असेही सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .
प्रारंभी रियाज शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले . राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जालिंदर कटरे यांचा विकासराव देशमुख – अश्विनी कासार – अष्टेकर यांच्या हस्ते सत्कार करणेत आला .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष जालींदर कटरे , माण खटावचे राष्ट्रवादीचे नेते विकासराव देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ. अश्विनीताई कासार अष्टेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ . सुजाता टिंगरे, दिघंचीचे नेते अतुल जावीर इत्यादींची भाषणे झाली. कुटीरोद्योग, ग्रामीण उद्योग, गारमेंट वगैरे लहान लहान युनिटच्या माध्यमातून काही उपक्रम सुरू व्हावेत . नगरपंचायत पातळीवरील विविध प्रश्नांवर सामुदायीक प्रयत्न करीत ते प्रश्न निकाली काढावेत . पंचायत समिती, जिल्हापरिषद, विविध महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार मिळवून देण्याचा प्रयत्न व्हावा, अशा भावना या मान्यवरांनी बोलून दाखविल्या .
यावेळी सामाजीक कार्यकर्ते मुस्लीम समाजाचे नेते इंजिनियर असिफ कलाल,दिघंचीचे नेते अजय कडव, गोमेवाडीचे साहेबराव कदम, बाळेवाडीचे पांडुरंग पुकळे, बनपुरीचे धुळाजी ठेंगले, आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते असिफ उर्फ बाबु खाटीक, अमीर खाटीक, रियाज शेख, शब्बीर मुलाणी, गुंड्या उर्फ इम्रान शेख, रॉमी शेख, इम्रान याशीन शेख असिफ कुरेशी – भडाळे, दत्तात्रय लांडगे, इरफान शेख, शब्बीर मुलाणी, सौ . रेश्मा बंडगर, सौ . मुमताज खाटीक, सौ.उज्वलाताई केंगार, सौ . शुभांगी जवळे शेटफळे , सौ . गोकुळा शंकरराव हाके, श्रीमती कोंदनबी शेख, सौ . रशिदा महंमद शेख, सौ . शबनम शेख, समिना शेख भिंगेवाडी, श्रीमती रशिदाबी खाटीक, श्रीमती शाबेरा बेपारी, सौ . राबियाँबसरी खाटीक इत्यादी अनेक जण उपस्थित होते . शेवटी असिफ उर्फ बाबु खाटीक यांनी आभार मानले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *