खासदार राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व पद परत मिळावे यासाठी उरण तालुका व शहर काँग्रेस तर्फे तहसीलदारांना निवेदन.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 28 लोकसभा सचिवालयने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केले आहे.राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ताबडतोब रद्द करून त्यांना त्यांची खासदारकी परत देण्यात यावी यासाठी देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्यासाठी तयार करण्यात आलेले निवेदन दिनांक 28 मार्च 2023 रोजी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका/ शहर काँग्रेस कमिटी तर्फे उरणचे नायब तहसीलदार नरेश पेढवी यांना देण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील,उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, तालुका महिला अध्यक्षा रेखा घरत, शहर महिला अध्यक्षा अफशा मुकरी,जयवंत पाटील, संदानंद पाटील,जासई काँग्रेस अध्यक्ष रमेश पाटील, तालुका सरचिटणीस वैभव ठाकूर, विनोद कदम, ज्ञानेश्वर पाटील,भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर,आदित्य घरत, उरण तालुका एन.एस.यु काँग्रेस सरचिटणीस अलंकार पाटील, इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी देशाचे राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य पद परत मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here