लोकशाहीची पायमल्ली, हुकूमशाही कडे वाटचाल : आमदार सुभाष धोटे

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :–सुरत खटल्यातील प्रकरणात न्यायालयाने 30 दिवसाचा अवधी देऊन देखील, आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. याच भीतीतून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कारवाई केली आहे .ही लोकशाहीची पायमल्ली असून हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.
अदानी प्रकरणावर मोदी सरकार अडचणीत आले आहे. अदाणी प्रकरणात विरोधकांनी सभागृहात बोलू नये यासाठी भाजपने सूडबुद्धीचे राजकारण केले आहे. सीबीआय, इडी सारख्या संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना वेटीस धरले आहे हे सुदृढ लोकशाहीसाठी मारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here