चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांसाठी ‘विकास योजनेअंतर्गत ५ कोटी २६ लक्ष रुपये’ निधी मंजूर* *♦️वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश*

*चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांसाठी ‘विकास योजनेअंतर्गत ५ कोटी २६ लक्ष रुपये’ निधी मंजूर*

*♦️वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर, दि. १५ : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्यासाठी ‘विकास योजनेअंतर्गत ५ कोटी २६ लक्ष रुपये निधीची मान्यता प्रदान करण्यात आली आहे’.राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे.

चैतन्य जेष्ठ नागरिक संघ सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी ६० लक्ष रुपये,चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत तुकूम गुरुद्वारा समोरील रस्त्यावर प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे ४५ लक्ष रुपये, चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विठ्ठल मंदिर प्रभाग क्र.१५ मध्ये साईबाबा क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ,चंद्रपूर व्यायाम शाळेचे बांधकाम करणे करीता १२५ लक्ष रुपये,चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत आंबेडकर नगर प्र.क्रमांक १७ येथे तथागत सिद्धार्थ बहुउद्देशीय मंडळ परिसरात व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यासाठी ८५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

हिंदुस्थान लालपेठ प्रभाग क्र.१६ येथे खुल्या जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी व सौंदर्यीकरणासाठी ७० लक्ष रुपये,सुगत नगर येथे श्री.जनबंधू व श्री.बच्चेवार यांचे घरापर्यत सिमेंट काँक्रिट रोडचे बांधकामसाठी १५ लक्ष रुपये,सुगत नगर येथे श्री.बारापात्रे ते श्री.विडे ते श्री.पोहेकर जिम पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व नालीचे बांधकामासाठी १५ लक्ष रुपये,गुरुदेव लॉन ते रणदिवे ते संदीप मोरे ते ढेंगळे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोड व नालीचे बांधकामासाठी १५ लक्ष रुपये, जटपुरा वार्ड,बजाज वार्डाच्या मागील परिसरात सामाजिक सभागृह बांधकामासाठी ४० लक्ष रुपये तर शास्त्रीनगर प्रभाग क्र.२ येथे चव्हाण रॉयल जवळील नाल्यापासून ते डी.आर.सी.रोड पर्यंत सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकामासाठी २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

श्री दुधानी यांचे घरापासुन ते मानसी अपार्टमेंट पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व भूमिगत नालीच्या बांधकामासाठी १० लक्ष रुपये,श्री.नरेश गगेलवार यांच्या घरापासून ते श्री अजय खडसे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व दोन्ही बाजूस नालीचे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष रुपये,वाघमारे ले-आऊट तसेच भवानी नगर येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी १६ लक्ष रुपये असे एकूण चंद्रपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एकूण ५ कोटी २६ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

चंद्रपूर येथे आतापर्यंत बाबुपेठ उडडाणपुलासाठी निधी, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी स्‍टेडियम, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्‍कृतीक सभागृहाचे आधुनिकीकरण व नुतनीकरण, कै. बाबा आमटे अभ्‍यासिकेचे बांधकाम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, दाताळा पुलाचे बांधकाम, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ,टाटा कॅन्‍सर हॉस्‍पीटलचे बांधकाम, सैनिकी शाळा , बाबुपेठ प्रभागात शांतीधाम विकसित करणे, पत्रकार भवन , बाबुराव शेडमाके स्‍टेडियमच्या बांधकामासाठी निधी मंजूर , ज्युबिली हायस्कूल च्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर , महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी 60 कोटी रु निधी मंजूर, जिल्‍हा स्‍टेडियमचा पुनर्विकास, शिवाजी चौकचे सौंदर्यीकरण, हुतात्‍मा स्‍मारकाचे बांधकाम, टाटा कॅन्‍सर हॉस्‍पीटलचे निर्माण, नियोजन भवनाचे बांधकाम, पोलिस विभागासाठी अत्‍याधुनिक जीमचे बांधकाम व पोलिस वसाहतीचे बांधकाम आदी विकासकामे यापूर्वी ना.मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर करत चंद्रपूर शहरात विकासाची मोठी मालिकाच उभी केली आहे.

आता चंद्रपूर शहराच्या विविध विकासकामांसाठी ५ कोटी २६ लक्ष रुपये मंजूर झालेले आहे, त्याबद्दल चंद्रपूर शहर महानगरातील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *