जुन्या पेन्शनसाठी कोरपना तालुक्यातील कर्मचारी बेमुदत संपात सामील ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️कार्यालयात शुकशुकाट ; शाळा ही बंद

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,-
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती च्या वतीने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारन्यात आला. त्या अनुषंगाने संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी ही कोरपना तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सक्रिय सहभाग नोंदवला. या संपात कोरपना तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक , भूमी अभिलेख ,महसूल, कृषी, बांधकाम , आरोग्य ,वन आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. त्यामुळे कार्यालयात संपूर्ण परिसरात शुकशुकाट दिसून येत होता.संपामुळे काही कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना कामाविनाच निराश पावली जावे लागले . शाळा,महाविद्यालय
ही बंदच होते,
. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरात धरणे देत संपात उस्फुर्तरित्या सहभाग घेतला. यामध्ये तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here