पेल्लोरा येथे शंकरपटाचे आयोजन. ♦️माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते उद्घाटन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– ब्रह्मनिष्ठ सद्गुरु बाजीराव महाराज यांच्या मठाच्या मदतीसाठी राजुरा तालुक्यातील मौजा पेल्लोरा येथे बैलजोडीच्या जंगी इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषद राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते पार पडले. बैलजोडीच्या या शर्यती दिनांक ११, १२ व १३ मार्च २०२३ अशा तीन दिवस चालणार असून अ, ब, क अशा तीन गटात विभागून स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटात प्रथम पुरस्कार ७ हजार, द्वितीय – ६ हजार, तृतीय – ५ हजार, चतुर्थ – ४ हजार, पाचवे – ३ हजार रुपये असे एकुण ५ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, पेल्लोरा चे सरपंच अरूणा झाडे, उपसरपंच मंगेश भोयर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनोद झाडे, नंदकिशोर अडबाले, धनराज लांडे, मोहन भोयर, शुभम बोबडे, बंडु भोयर, विठोबा भोयर, महादेव बोबडे, सचिव निलेश डवरे, वासुदेव शेरकी, सुनंदा बोबडे यासह पेल्लोरा व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here