



लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी
वालुर येथील झिरोफाटा परीसरातील बंद पडलेले रस्त्याचे काम पत्रकार राम सोनवणे यांच्या धरणे आंदोलनामुळे दि.११ मार्च शनिवार रोजी तात्काळ सुरू करण्यात आले. तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या वालुर गावातील झिरोफाटा परीसरात बंद करण्यात आले होते. याठिकाणी विखुरलेली गिट्टि व अर्धवट झालेल्या कामामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत होते. या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे यासाठी पत्रकार राम सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकामाकडे धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार ११ मार्च रोजी पत्रकार राम सोनवणे यांनी धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान सरपंच संजय साडेगावकर ,गणेश मुंढे, मोहम्मद इसमाईल, पांडुरंग रोकडे, युवा उदयोजक शैलेश तोष्णीवाल,श्रीहरी आबुज,संघर्ष मित्रमंडळाचे बालाजी हारकळ आदिनी पत्रकार राम सोनवणे यांच्या आंदोलनास पाठिंबा देत रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे तसेच या परीसरात रस्त्याचे रूंदिकरण व दुतर्फा नाली बांधकाम करण्यात येवून होणाऱ्या अरुंद रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान सेलु – जिंतुर रस्त्याचे काम कल्याण टोल इनफास्टरकरच कंपनी कडून करण्यात येत आहे. वालुर गावातील झिरोफाटा परीसरात रस्त्याचे काम अरुंद होत असल्याचा आरोप करत काही दिवसापासून नागरीकांनी बंद पाडले होते.बंद पडलेल्या या परिसरात धुळिचे साम्राज्य पसरले होते. रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत होती. परंतु रस्त्याचे काम रखडले होते.पत्रकार राम सोनवणे यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर संबंधित इनफास्टरकरच कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी धरणे आंदोलनाची दखल घेत रखडलेले काम तात्काळ सुरू केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोहम्मद शिराज खाँ,बळिराम माने,कल्याण टोल इनफास्टरकरचे अविनाश साबळे, शाम भोसले यांनी धरणे आंदोलन स्थळी येवून निवेदन स्विकारले व काम तात्काळ सुरू करण्यात आले.