आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपना तालुक्यात ६.५० कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन

 

लोकदर्शन👉मोहन भारती

कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने कोरपना तालुक्यात एकूण ६ कोटी ५० लक्ष रुपयाचे निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते आज पार पडले. यात जनसुविधा योजने अंतर्गत मौजा बाखर्डी येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे किंमत २० लक्ष, मौजा तळोधी येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे किमंत २० लक्ष, मौजा खैरगाव (ग्रा. पं. तळोधी) येथे पाणीपुरवठा योजना बांधकाम करणे किंमत ४० लक्ष, मौजा वडगाव येथे पाणीपुरवठा योजना अंतर्गत बांधकाम करणे किंमत ९५.५१ लक्ष, मौजा बिबी येथे जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना अंतर्गत बांधकाम करणे, किंमत ४ कोटी ७४ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, अल्ट्राटेक सिमेंट कमिटीचे व्यवस्थापक गौतम शर्मा, सतीश मिश्रा, गट विकास अधिकारी विजय पेंदाम, बाखर्डी चे सरपंच अरुण रागीट, उपसरपंच वैशाली गानफाडे, शैलेश लोखंडे, हरिदास जेणेकर, ग्रा. प. सदस्य सुभाष ताजने, प्रकाश खुसपुरे, अमृता बुचुंडे, रीना पेंदोर, रविकुमार कुंभारे, माया मडावी, प्रज्ञा यावलिकर, डॉ हर्षानंद हिरदेवे, विलास कोंगरे, अभियंता पाणीपुरवठा विभाग सतीश खोब्रागडे, ग्रामसेवक कातकर, तळोधी चे सरपंच ज्योती जेनेकर, उपसरपंच राजू चतूरकर, वंदना गोखरे, रवींद्र कुळमेथे, कुंदाबाई मडावी, गोरखनाथ लांडगे, कुसुम संकुलवार, वडगांव चे उपसरपंच सुदर्शन डवरे, कैलाश मेश्राम, शामकांत निखाडे, रामदास कांनके, बायनाबई चायकाटी पुष्पा मेश्राम, वर्षा बावणे, शैला गोहोकार, बिबी चे सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच प्रा. आशिष देराकर, ग्रा. प. सदस्य गीता मिलमिले, सोनाली आत्राम, भारत पिपळकर, सूरज कुळमेथे, राजू नन्नावरे, लीलाबाई चंद्रगिरी, दुर्गा पेन्दोर, बंडू नैताम, शिवराज बसवते, प्रणाली कोंगारे, आनंदराव पावडे, कवडूजी पिंपळकर, देवराव आष्टेकर, सचिन मडावी, संदीप पवाडे, रतनकुमार हेपट, सुधीर ढवस, दसरथ राऊत यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *