Home
Home Breaking News प्रा विजय आकनूरवार यांना जेष्ठ पत्रकार जीवन गौरव पुरस्कार जाहीर

प्रा विजय आकनूरवार यांना जेष्ठ पत्रकार जीवन गौरव पुरस्कार जाहीर

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा 2023 चा स्व महियर गुंडेवीया स्मृती जेष्ठ पत्रकार जीवन गौरव पुरस्कार स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले उपप्राचार्य विजय आकनूरवार यांना जाहीर झाला आहे,
येत्या 6 जानेवारी ला सकाळी 11 वाजता राजुरा तालुका पत्रकार संघाचे वतीने आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा विजय आकनूरवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत,
पत्रकार दिन सोहळ्यात राष्ट्रीय ओबीसी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा हंसराज अहीर ,आमदार सुभाष धोटे,दै भास्कर चे मुख्य संपादक प्रकाश दुबे,माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर,संजय धोटे,माजी नगर परिषद अध्यक्ष अरुण धोटे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,
दै, लोकसत्ता चे पत्रकार प्रा विजय आकनूरवार यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने तसेच मित्र परिवार ने त्यांचे अभिनंदन केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here