सनराइज योगा बेनिफिट ग्रुप ,गडचांदूर च्या वतीने *♦️जागतिक महिला दिन साजरा*

 

लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,
सनराइज योगा बेनिफिट ग्रुप, गडचांदूर द्वारे अहिल्यादेवी होळकर मंदिर ओपन स्पेस,मंदे ले-आउट, वार्ड नं.5 ,गडचांदूर येथे दिनांक 8 मार्च ला रोज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य विषयक जनजागृती व महिला विषयी सन्मान व्यक्त करण्यासाठी सकाळी 5:00 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
•सर्वप्रथम पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर ग्रुपच्या महिला सदस्यांनी पुष्प वर्ष्याव व टाळ्यांच्या गजरात स्वागत करून व्यासपीठावर सन्मानाने विराजमान करण्यात आले.*
**याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला विकास मंडळ ,चंद्रपूर तथा किलबिल संस्था, चंद्रपूर च्या अध्यक्ष सौ नंदाताई अल्लूवार होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी समाज बालकल्याण सभापती डॉ.आसावरीताई देवतळे , सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रभाताई वासाडे ,न.प.गडचांदूर च्या नगराध्यक्ष सौ.सविताताई टेकाम, जेष्ठ सामाजिक आर्थिक शास्त्रज्ञ , सौ ममता बोढाले ,(मुंबई),छत्रपती संभाजी महाराज प्रशासकीय महाविद्यालय चंद्रपूर चे प्राचार्य डॉ दिलीप चौधरी, माजी आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप खेकडे तसेच न.प. गडचांदूर चे उपनगराध्यक्ष श्री शरद जोगी उपस्थित होते*
*कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्षा व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मा साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर तसेच प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सनराईज योगा बेनिफिट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी गुरुवंदना केली.*
*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे स्वागतगीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.**
* कार्यक्रमाचे प्रास्ताविक सनराईज योगा बेनिफिट ग्रुप गडचांदूरच्या सदस्या सौ अश्विनी प्रशांत धाबेकर यांनी केले*
*याप्रसंगी मंचावरून उपस्थितांना संबोधित करताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ नंदाताई अल्लूरवार म्हणाल्या,” स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी जो लढा दिला तसेच महिला आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करित आहेत त्यांच्या सन्मानार्थ आपण हा जागतिक महिला दिन साजरा करतो. सनराइज् बेनिफिट योगा ग्रुपच्या सदस्यांद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची स्तुती केली , योगासोबतच अनेक उपक्रम राबवून स्त्रियांना सक्षम बनवण्याची सूचना ही त्यांनी यावेळी केली. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.आसावरी देवताळे यांनी महिलांचे आजार व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले . प्रमुख पाहुण्या सौ ममता बोढाले यांनी 21 व्या शतकातही समाजात चाललेल्या अनिष्ट रूढी ,परंपरा, स्त्रियांवरील अत्याचार त्यावर एकत्र येत कशी मात करावी याविषयी प्रखर शब्दात मत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर प्रभाताई वासाडे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गडचांदूर मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन कोरपणा तालुका अध्यक्ष डॉ प्रदीप खेकडे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ दिलीप चौधरी यांनी विविध उदाहरणे व दाखले देत महिला कशा उत्तम व्यवस्थापक आहेत,शेतीचा खरा व्यवसाय महिलांनीच चालु केला, तसेच स्त्री मल्टी टास्किंग असून ती आज जगात कशी सक्षम उभी राहत आहे याबद्दल आपले मत व्यक्त केले.
* याप्रसंगी सर्व पाहुण्यांचं शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सनराइज योगा बेनिफिट ग्रुपच्या प्रमुख मार्गदर्शक कुंतल चव्हाण यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.*
सनराईज योगा बेनिफिट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी याप्रसंगी विविध एरोबिक डान्स सादर केले व आरोग्य विषयक नाटिका सादर केली. सोबतच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धांमध्ये बक्षीस प्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली
* रांगोळी स्पर्धा –
प्रथम क्रमांक-सौ सुषमा उरकुडे *द्वितीय क्रमांक -सौ लीना लांजेकर
तृतीय क्रमांक – सौ रोशनी गंधारे
*पाककला स्पर्धा-
प्रथम क्रमांक-सौ अर्चना आगलावे
द्वितीय क्रमांक- सौ प्रिया मत्ते
तृतीय क्रमांक-सौ शोभा पवार व सौ अश्विनी धाबेकर
*प्रश्नमंजुषा स्पर्धा
विजेता संघ रीना ग्रुप

*कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रशांत बाळकृष्ण धाबेकर यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार सौ हुलके मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करता सनराईज योगा बेनिफिट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कठोर मेहनत घेतली त्यामुळे कार्यक्रमाचे शिस्तबद्ध पद्धतीने झालेलं आयोजनाच सर्व प्रमुख पाहुण्यांनी अतिशय कौतुक केलं.*
*कार्यक्रमाला सनराईज योगा बेनिफिट ग्रुप चे सर्व सदस्य बहुसंख्य महिला तसेच गावातील नागरिक उपस्थित होते .*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here