रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या माध्यमातून ग्रामिण भागातील शाळांच्या मदतीसाठी धावले डोंबिवलीकर. .. !*

लोकदर्शन डोंबिवली👉 (गुरुनाथ तिरपणकर)

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट ही संस्था गेली तेहतीस वर्ष समाजाच्या विविध क्षेत्रात सेवाभावी कार्य करत आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या या क्लबने कुपोषित गर्भवती महिलांना मदत करणे, थलीसेमिया निर्मूलन, शहापूरमधील शाळेला स्वच्छ पाणीपुरवठा करणे, बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत करणे असे अनेक प्रकल्प राबिवले आहेत. ह्या व्यतिरिक्त समाजामध्ये आरोग्य जागरूकता निर्माण करण्याचा क्लबचा मानस आहे. ह्याच उद्देशाने गेली अनेक वर्षे ही संस्था ‘ डोंबिवली प्राइड रन ‘ हा महत्त्वाकांक्षी मॅरेथॉन प्रकल्प मोठ्या यशस्वीपणे पार पाडीत आहे. ह्या वर्षी गरजवंत शाळांना योग्य ती मदत करणे हा ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्धेश असून यंदाच्या वर्षीही रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी ही भव्य मॅरॅथॉन आयोजित केली गेली. डोंबिवली पूर्वेच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या के. डी.एम.सी. मैदानावरून सकाळी ६:३० वाजता ही स्पर्धा सुरु झाली. *डी.बी.जाधव समूह* हे या प्रकल्पाचे प्रमुख प्रायोजक व युरोस्कूल, डोंबिवली हे अन्य प्रायोजक होते. तसेच सोनाली गार्डन हे हॉस्पिटॅलिटी, Optilife हॉस्पिटल हे मेडिकल व द डिजिटली हे सोशल मीडिया साठी भागीदार होते. या प्रकल्पाचे इव्हेंट मॅनेजमेंट रनबर्न ह्या संस्थेने केले व अनेक नामांकित धावपटू ह्यात सहभागी झाले होते. ह्या मॅरेथॉनमध्ये यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांचा पारितोषक वितरण सोहळा सकाळी 9 वाजता पार पडला. तसेच डोंबिवली शहराचे नाव उंचावणारे पद्मश्री गजानन माने व धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर आठ तास चाळीस मिनिटात पोहून पार करणाऱ्या अवघ्या दहा वर्षे वयाच्या आरव गोळे ह्या चिमूरड्याचाही ह्या वेळी सत्कार करण्यात आला. अशी माहिती रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्री.शैलेश गुप्ते व प्रकल्प प्रमुख श्री. चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *