*ते भेटले अठ्ठावीस वर्षांनंतर…..* *वर्गमित्राची भेट* *झाल्याने सर्वजण भारावून गेले* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *गेले ते दिवस राहिल्या फक्त त्या आठवणी एक दिवस मित्रासाठी मित्र भेटले जुन्या आठवणी झाल्या ताज्या*

लोकदर्शन गडचांदूर,,👉(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

*चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील सन 1995 ची दहावीची टीम एकत्र आली. या सर्व मित्रांना एकत्र करण्यासाठी मागील दोन* *महिन्यापासून शंकर अपुरकर व नितीन नगराळे यांनी संपर्कात असणाऱ्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी व्हाटसअप , फेसबुक, समाज माध्यमांची मदत घेतली व विनोद मेकलवार या मित्रांच्या कृषी फार्म हाऊस परसोडा येथे एकत्र येत गेट-टुगेदर साजरा केला. 28 वर्षानंतर का होईना आपल्या मित्रांना भेटण्याचा आनंद हा वेगळाच या ठिकाणी मिळाला. यामध्ये शेतकरी, पोलीस पाटील ,सरपंच, मॅनेजर प्राध्यापक ,पत्रकार, नोकरी, व्यवसाय करणारे मित्र एकत्र येत सुखदुःखाच्या गोष्टी पुढील आयुष्य जगत असताना निरोगी आयुष्य व आनंददायी* *आयुष्य व तणाव मुक्त अल्हाददायी निसर्गाच्या सानिध्यात एकत्र आल्यामुळे शालेय जीवन व नंतर कालच्या जीवनात केलेले एन्जॉय आजही या वयामध्ये लपविता आले नाही आणि हीच खरी मित्राची मोठी संपत्ती अशाप्रकारे एक दिवस मित्रांसाठी या ठिकाणी आनंद साजरा केला मित्रांचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही* *कारण दुःखात असो सुखात ते आपल्याला कधीच एकटे सोडत नाही. तसेच या भेटीदरम्यान पुढील काळात समाज उपयोगी कामासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र येत पुढाकार घेण्याचा संकल्प केला. आपल्या आयुष्यातील सुखदुःखाचे प्रसंग यावेळी एकमेकांशी वाटून घेतले.या स्नेहसंमेलनात सहभागी झालेले शंकर आपुरकर, नितीन नगराळे,राजु कादरी, हबिब शेख, मनोज भोजेकर,हरिहर खरवडे,प्रविण मेश्राम, प्रमोद गावंडे, विनोद लोंनगाडगे, नरेन्द्र काकडे, किशोर बल्की, संजय कोडबतुलवार,अनिल नागपुरे,सचिन गायकवाड,गणपत गाडगे, मनोज मोडक, अरविंद बोबडे, विनोद मेकलवार,गुरूदास मून, दादा चापले आदि सर्व मित्रमंडळी या कार्यक्रमात उपस्थित होते.*
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *