सावित्रीबाई फुले विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा.

लोकदर्शन 👉 मोहन.भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे दिनांक 27 फेब्रुवारी ला मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व, इतिहास व मराठी भाषेचे संगोपन याविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक अनिल मेहरकूरे यांनीही मराठी भाषेचे महत्त्व विषद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन सेवाजेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले. याप्रसंगी सुरेश पाटील बावनकर सर ,मांढरे सर ,जी. एन.बोबडे सर, ज्योती चटप, श्रीमती सुषमा शेंडे ,माधुरी उमरे प्रा. सोज्वल ताकसांडे, प्रा.गुजर, प्रा. पोडे, प्रा.मुप्पिडवार,प्रा.जहीर, प्रा. सातारकर ,भालचंद्र कोगरे सर,मेश्राम सर, मरसकोल्हे सर,यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *