Home
Home Breaking News विहीरगाव येथे आरो प्लांट चे लोकार्पण.

विहीरगाव येथे आरो प्लांट चे लोकार्पण.

 

लोकदर्शन 👉.मोहन भारती

राजुरा :– माझी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या खनिज विकास निधी अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायत विहीरगाव येथे मंजूर अंदाजीत १४ लाख रुपये किंमतीच्या आरो प्लांट चे लोकार्पण कार्यक्रमाचे उद्घाटक सेवा कलस फाउंडेशन चे अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे पुण्याचे काम आहे. नागरिकांसाठी आपुलकी आणि तळमळ असली की असे लोकोपयोगी काम सरपंच आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या हातून संपन्न होते असे मत अभिजित धोटे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी विहीरगावचे सरपंच ॲड. रामभाऊ पंढरीनाथ देवईकर, उपसरपंच नीलकंठ गोविंदा खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तुकाराम भिवणकर, माधुरी विजय चिडे, पूजा वाघमारे, गणेश वांढरे, प्रेमलता गंगाधर बोढे, गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्धव पाटील साळवे, पिलाजी पाटील साळवे, पंढरीनाथ देवईकर, मनोहर धुडसे, वसंत आसंपलीवर, मनोज खेडेकर, दामोदर बावणे, वैजनाथ खेडेकर, मारोती वनकर, अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे प्रदीप वासाडे व त्यांचे सहकारी आणि विहीरगाव येथील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here