जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था च्या संचालक पदी काकासाहेब नागरे विजयी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था गडचांदूर च्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण गटातून काकासाहेब बाबुराव नागरे यांची संचालक पदी निवड झाली ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे कार्यरत असून त्यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची ओळख सर्वत्र असल्यामुळे शिक्षक मतदारांनी त्यांना पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये संचालक पदावर निवडून दिल्याचे बोलले जाते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चे जिल्ह्यातील प्रथम संचालक होण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे एनपीएस धारक सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आणि आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या सर्व सहकारी शिक्षक बांधवांना दिले आहेत ,दिनांक 16 फेब्रुवारी 2022 ला ही निवडणूक पार पडली व सायंकाळी उशिरापर्यंत निकाल हाती आले
या संस्थेचे एकूण 422 सभासद असून 96 टक्के मतदान झाले,
आदर्श शिक्षक काकासाहेब नागरे संचालक पदी निवडुन आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *