वडूज सातारा येथे होणार मराठी साहित्य संमेलन खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार

 

लोकदर्शन सातारा ; वडूज👉राहुल खरात

( यशवंतराव चव्हाण साहित्य नागरी वडुज )अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात सस्थेतर्फे सातारा जिल्ह्यातील वदुज शहरामध्ये
राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे
या संमेलनाचे उद्घघाटन खासदार माननिय सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होणार असून माझी न्यायाधीश ज्येष्ठ विचारवंत, लेखक रावसाहेब झोडगे हे समेलानाचे अध्यक्ष पद भूषविणारे आहेत या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवयित्री लालिताताई गवांदे, कोल्हापूर येथील ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, कराड येथील ज्येष्ठ कवी सुरेश लोहार तसेच कराड येथील ज्येष्ठ लेखक, माजी पोलिस उपायुक्त विनायकराव जाधव, उस्मानाबाद येथून सिध्देश्वर कोळी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच नागपूर येथील सिद्धार्थ कुलकर्णी, समता परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष नीलेश भुजबळ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत
तसेच बडूज चे माजी नगराध्यक्ष डी महेश गुरव, अंधा श्रद्धा निर्मूलन समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बंडा गोडसे सर, म्हसवड चे न सा म् चे शहर अध्यक्ष महादेव सरतापे आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक गणेश शिंदे म सां म चे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश थळकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत
राज्य घटनेमध्ये बदल आवश्यक आहे का? हा विषय असलेल्या परिसंवादाचे अध्यक्ष पद परभणी येथील डॉ प्रल्हाद भोपे ज भूषविणारे असून पुणे येथील डॉ जनार्दन भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार मांडणार आहेत
नांदेड येथील सुप्रसिध्द कवी डॉ घनःश्याम पांचाळ हे कवी संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविणारे असून उस्मानाबादच्या कवयित्री मधुरा कर्वे, पिंपरी चिंचवड येथील जयश्री श्रीखंडे, पुणे येथील डॉ निता बोडके प्रमुख पाहुणे म्हणून नवोदित कवींना मार्गदर्शन करणार आहेत
याच संमेलनामध्ये कवयित्री सीमा मंग्रुळे यांच्या मयुरपणख या बल कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे तसेच विनायकराव जाधव याना महाराष्ट्र जीवन गौरव साहित्य भूषण हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे हे विशेष होय
या संमेलनाला उस्मानाबाद येथून शेषनाथ वाघ, संदीप जगताप सर, मीना महामुनी वर्धा येथील लता हेदावू आदी मान्यवर बरोबरच राज्यभरातून लेखक कवी या साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे या संमेलनास मधे कराड येथील गायत्री विभुते या शिवराय बिरुदावली पुकर करणार आहेत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पद वडुझ क्या नगरसेविका आरती काळे या सर्व मान्यवरांचे स्वागत करणार आहेत याचं कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या साडेचारशे क्या वर प्रस्ताव मधून पंधरा ते वीस लेखकाना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले सहितूनहुषण, समाजभूषण आणि विद्याभूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे
तरी रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, संपूर्ण दिवसभर बुद्धिक कार्यक्रमाची रेलचेल असल्यामुळे सर्वांनी वेले वर सकाळी दहा वाजता उपश्टित रहावे असे नम्र आवाहन मुख्य आयोजिका यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे सर्व कार्यक्रम सावित्रीबाई फुले या विचार मंचावर होणार असून मुख्य प्रवेश दवाराला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे हे विशेष होय

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *