लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या महामानवाच्या जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.