कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि ९
लेट निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक २०२३ या क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न सोहळा रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता उरण तालुक्यातील दादरपाडा गावात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते झाले. हा दिमाखदार उदघाट्न सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सद्स्य तथा माजी जिल्हा परिषद सद्स्य डॉ. मनिष पाटील, जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित, जिल्हा चिटणीस महेंद्र मुंबईकर, मुरलीधर ठाकूर, एनएसयुआयचे उरण तालुका अध्यक्ष आदित्य घरत,उरण तालुका इंटकचे उपाध्यक्ष राजेश ठाकूर,अंगत ठाकूर व मोठया संख्येने क्रिकेट रसिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *