वालुर येथे दर्पण दिन साजरा

 

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन म्हणुन येथील पत्रकारांनी साजरा केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईसचेअरमन राजेश साडेगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवानराव खपले,मधुकर भुते बंडु आरे,पत्रकार महादेव गिरी, राहुल खपले,जावेद कुरेशी, बिलाल तांबोळी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साडेगावकर व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महादेव गिरी, राहुल खपले, जावेद कुरेशी ,बिलाल तांबोळी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईसचेअरमन यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *